Manikrao Kokate welcome banners have started to be discussed in political circles PPK
Marathi December 23, 2024 04:24 AM


सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या फडणवीस सरकारने मोठ्या पदाची जबाबदारी देऊ केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक : राज्यातील 39 मंत्र्यांचे शनिवारी (ता. 21 डिसेंबर) खातेवाटप जाहीर करण्यात आले. ज्यानंतर नवनिर्वाचित मंत्री आपापल्या मतदारसंघात जाऊ लागले आहेत. मंत्री आपल्या मतदारसंघात पहिल्यांदाच जात असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या फडणवीस सरकारने मोठ्या पदाची जबाबदारी देऊ केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषीखाते देण्यात आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच त्यांच्या स्वागतासाठी आणि अभिनंदानासाठी नाशकात बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र, हेच बॅनर आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. (Manikrao Kokate welcome banners have started to be discussed in political circles)

मंत्री बनल्यानंतर माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदाच त्यांच्या सिन्नर येथील घेरी गेले. यावेळी संपूर्ण नाशिक शहरात त्यांच्या स्वागताचे आणि अभिंदनाचे बॅनर लावण्यात आले. मात्र, या बॅनरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार तथा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा फोटो माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर लावण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. पण यामुळे कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. परंतु, सरकारने नाशिकच्या भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलले असले तरी नाशिकच्या दुसऱ्या नेत्याला मात्र मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. ज्यामुळे नाशकात राष्ट्रवादीतील वाद नव्याने समोर आला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Maharashtra Cabinet : नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला मानाचे पान, फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवारांचा निर्णय

मंत्री माणिकराव कोकाटेंनी या बॅनरबाबत खुलासा करत म्हटले आहे की, माझे आणि त्यांचे (आमदार छगन भुजबळ) काही मतभेद असतील मात्र वैर नाही. जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कोणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही. मला विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते भुजबळांचा फोटो टाका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर भुजबळांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर असल्याबाबत कोकाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, मला माहीत नाही बॅनर कोणी लावलेले आहे. कार्यकर्त्यांना जे योग्य वाटते ते कार्यकर्ते करतात.


Edited By Poonam Khadtale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.