Stock Market Investment Tips: शुक्रवारी अखेरीस सेन्सेक्स 1,176.46 अंकांच्या अर्थात 1.49 टक्क्यांच्या घसरणीसह 78,041.59 वर बंद झाला आणि निफ्टी 364.2 अंकांच्या अर्थात 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23,587.50 वर बंद झाला.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्हीके विजयकुमार म्हणाले की, भारतातील कमाईतील मंद वाढीमुळे, FII कडे सध्या इथे गुंतवणूक करण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. ते म्हणाले की, डॉलर स्थिर झाल्यावर एफआयआय परत येऊ शकतात, पण नजीकच्या काळात गुंतवणुकीवर दबाव राहील.
फेब्रुवारीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीपूर्वी थोडी रिकव्हरी दिसू शकते. पण बाजाराचा एकूण दृष्टिकोन सावधगिरीचा आहे. सध्याच्या घसरणीमुळे निवडक लार्ज-कॅप शेअर्सचे, विशेषतः बँकिंग सेक्टर्सच्या व्हॅल्युएशन चांगले झाले आहे, असेही व्हीके विजयकुमार म्हणाले. यावेळी आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेत खरेदीच्या चांगल्या संधी दिसत आहेत.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?टेक महिन्द्रा (TECHM)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
ट्रेंट (TRENT)
एम फॅसिस (MPHASIS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
गोदरेज प्रॉप्रटीज (GODREJPROP)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
आयडिया (IDEA)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.