नाताळ (ख्रिसमस) सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढली आहे. नाताळचा प्रमुख भाग म्हणजे प्रभू येशू यांच्या जन्माचा उत्सव, ज्यात केक कापून हा सण साजरा केला जातो. यामुळे बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध झाले आहेत, तर काही घरगुती आणि छोटे विक्रेते कमी किमतीत बनवलेले केक ग्राहकांसाठी उपलब्ध करतात.
भारतामध्ये सण साजरे करण्याची एक खास परंपरा आहे, ज्यामध्ये खास खाद्यपदार्थांचे महत्त्व आहे. नाताळच्या दिवशी केक ही मुख्य आकर्षण असते, आणि त्यावर आधारित विविध प्रकारांच्या केकची मागणी वाढली आहे. विशेषतः रम केक किंवा प्लम केक नाताळ सणासाठी खास बनवले जातात. यामध्ये रम मद्याचा वापर करुन सुका मेवा भिजवून त्याला केकमध्ये मिसळले जाते. यामुळे केकची चव आणि रुचिरता वाढते.
केकचे प्रकार:प्लम केक
रम केक
पायनापल केक
आयस बकेट केक
चॉकलेट ख्रिसमस ट्री
चॉकलेट स्टार
रिच प्लम केक
रिच प्लम पुडींग
नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणीख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अनेक बेकरी उत्पादक आणि घरगुती केक बनवणारे केक बनवायला सुरुवात करतात. याचे कारण म्हणजे नाताळच्या दिवशी केकला सर्वाधिक मागणी असते. विशेषतः फ्रूट केकला अधिक मागणी असते. या केकमध्ये ड्रायफ्रुट्सचे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केक देखील बाजारात लोकप्रिय आहेत.
भारतात नाताळसाठी सहसा फळांचा वापर करून केक तयार केला जातो. पारंपरिक बेकरी उत्पादक रम मद्याचा वापर करतात आणि केक सजवण्यासाठी आयसिंग व शोभेच्या वस्तू वापरतात. मात्र, आम्ही मद्याचा वापर न करता बचत गटाच्या माध्यमातून घरगुती केक तयार करतो. यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे, अशी माहिती गीता पवार, अध्यक्ष, बचतगट यांनी दिली.