मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारले असून ते आज पुण्यातील भीमथडी जत्रेस भेट देणार आहेत. शरद पवार यांनी काल मुख्यंमंत्र्यांना फोनवरुन निमंत्रण दिले होते.
Sharad Pawar : शरद पवारांच्या आमदाराने घेतली अजित पवारांची भेटवडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी घेतली अजित पवार यांची भेट
मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारे यांची माहित
भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारेंचा दावा
पुण्यातून शरद पवारांचे एकमेव आमदार आहेत बापू पठारे
Chhagan bhujbal : छगन भुजबळ दिल्लीला जाणार, कुणाची भेट घेणार? चर्चांना उधाणछगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत ते कुणाची भेट घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
Chhagan bhujbal : देवेंद्र फडणवीसांबरोबर काय चर्चा झाली? छगन भुजबळ म्हणाले...आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी समीर भुजबळदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांबरोबर सामाजिक व राजकीय विषयावर चर्चा झाली. यावेळी ओबीसींवर अन्याय होणार नाही, असा शब्द त्यांनी दिला, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
Chhagan bhujbal : थोड्याच वेळात छगन भुजबळांची पत्रकार परिषद; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काय बोलणार?देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Marathi News : नाराज छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; सागर बंगल्यावर घडमोडींना वेगमंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांची नाराजी दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांची घेणार भेटलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील.
Ajit pawar: अधिवेशन संपताच अजित पवार प्रशासकीय कामांमध्ये सक्रियअधिवेशन संपताच अजित पवार प्रशासकीय कामांमध्ये सक्रिय
पुण्यातील विविध कामांचा अजित पवार घेणार आढावा.
आज पुण्यातील सारथी संस्थेच्या संचालकाची भेट
तसेच भीमा कोरेगाव येथील विजयस्तभांची करणार पाहणी
तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळाच्या विकास कामांची करणार पाहणी…
Tuljapur: तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दीलग्नसराई व ऐकीकडे नाताळच्या सुट्या यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.लग्न कार्यानंतर कुलधर्म कुलाचार पुजा करण्यासाठी नवदांपत्यांनी तुळजापूरात गर्दी केली आहे तसेच नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर पुढील आठ दिवसाचे अभिषेक पुजेचे बुकींग फुल्ल झा आहे.मागील काही दिवसापासून लग्न तिथी मोठ्या प्रमाणावर आहेत शुभ कार्यानंतर कुलदैवतांच्या दर्शनासाठी येण्याची प्रथा आहे.त्यामुळे भाविक अभिषेक पुजा,जागरण गोंधळासाठी मोठी गर्दी करत असल्याने तुळजापुर नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.
कांदिवली पूर्व ठाकूर विलेज मध्ये एका कारला आग, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही. कार आगीत जळून खाकघरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड मारून रेल्वेने पळून गेलेल्या फरार आरोपी पतीला गुन्हे शाखा युनिट -6 च्या पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेलते आहे. कैलास गणपत जाधव, (वय 44, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पद्मिनी कैलास जाधव, (वय 40) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. पद्मिनी जाधव यांची प्रकृती अद्याप गंभीर असून बेशुद्ध अवस्थेत ससून रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Mumbai live: गौतमी पाटीलला पाहण्यासाठी अंधेरीकरांनी केली गर्दीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला चार दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते रविवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपली उपस्थिती लावली यावेळी गौतमी पाटील तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अंधेरीकरांनी गर्दी केली.गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला. यावेळी गौतमीच्या नृत्यावर अंधेरीकर थिरकल्याचे देखील पाहायला मिळाले.लहान थोरापासून सर्वच प्रेक्षकांनी यावेळी गौतमीच्या नृत्याचा आस्वाद घेतला.
Pune Live: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली वाघोली अपघताची माहितीअपघताची कारणे, रुग्णालयात दाखल झालेल्या इतर जखमींची अजित पवार यांनी घेतली माहिती
दुपारी अजित पवार अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता
आज अजित पवार कोरेगाव भीमा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी जात असताना वाघोली अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता
Pune: पुण्यात १२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूतीपुण्यात १२५० मृदंगांच्या एकत्रित वादनातून स्वरब्रम्हाची अनुभूती
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या मृदंग वादकांनी केले मृदंग वादन
जय जय विठोबा रखुमाई चा गजर, तब्बल १२५० मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ
Marathi Ekankika Spardha LIVE : राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा शुक्रवारपासून इचलकरंजीतइचलकरंजी : येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे सव्विसावे वर्ष आहे. शुक्रवारी (ता. २७) दुपारी एक वाजता उद्घाटन होणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, बेळगाव विभागातील ३६ संघांचा सहभाग आहे. परीक्षक ज्ञानेश मोघे (गोवा), मंगेश दिवाणजी (पुणे), यशोधन गडकरी (सांगली) आहेत.
Tamil Nadu Rain LIVE : तामिळनाडूत मुसळधार पाऊस, थुथुकुडीच्या अनेक भागात साचले पाणीतामिळनाडू : मुसळधार पावसामुळे थुथुकुडीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
कोल्हापूर : गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या रॅकेटमधील एका औषध विक्रेत्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. विजय सुनील पाटील (वय २५, रा. वरणगे पाडळी ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. संशयिताने बनावट डॉक्टर डी. बी. पाटील याला औषधे पुरविल्याची माहिती समोर आली आहे.
MPSC Exam LIVE : 'एमपीएससी'ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीकोल्हापूर : एमपीएससीच्या समाजकल्याण अधिकारी (गट-अ) पदाची परीक्षा २५ डिसेंबर रोजी होणार आहे. यादिवशी इतर परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याचा विचार करून एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलावी. नवीन तारीख जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससीच्या परीक्षार्थिंनी केली आहे. यादिवशी नाताळ सणाची सार्वजनिक सुटी असताना सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट (अ), सहायक संचालक/संशोधन अधिकारी/ प्रकल्प अधिकारी (गट अ) या पदाच्या परीक्षा घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले आहे.
Pune Accident LIVE : डंपर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यातपुण्यात ९ जणांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गजानन तोटे असे ताब्यात घेतलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. भरधाव वेगात डंपर चालवत होता, तसेच तीव्र उतार असल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट फुटपाथवर गेल्याने अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
बेळगाव : एकीकडे सांबरा विमानतळाचा विकास केला जात आहे, तर दुसरीकडे टप्प्याटप्प्याने विमानसेवा बंद होत आहे. यामुळे बेळगावकरांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्तम प्रतिसाद असूनही बेळगाव ते तिरुपती दरम्यानची विमानसेवा गेल्या १५ दिवसांपासून बंदच आहे. तिरुपतीला जाण्यासाठी बेळगावकरांना पर्यायी व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत आहे.
Rahul Gandhi on Parbhani LIVE : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावरLatest Marathi Live Updates 23 December 2024 : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर येत असून ते सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. तसेच काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे काम जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, बेळगाव ते तिरुपती दरम्यानची विमानसेवा गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..