LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल
Webdunia Marathi December 25, 2024 08:45 AM

Maharashtra Marathi Breaking News Live Today: 20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पालघरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार, एका गावकऱ्याने तक्रार केली होती की वनक्षेत्रात असलेली त्याची जमीन परत मिळवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी लाच मागितली जात होती.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

सध्या सोशल मीडियावर गोवा वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. तसेच गोव्याला जाणारी वंदे भारत ट्रेन कल्याणमध्ये पोहोचल्याचे बोलले जात आहे. आता स्वत: रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून मार्ग वळवावा लागल्याची चर्चा आहे.

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या महिला सन्मान योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत, महाराष्ट्र सरकार दरमहा 1500 रुपये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर पाठवते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवली जाते.

मुंबईतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर भीषण आग लागली. ही आग एका भंगाराच्या गोदामात लागली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंसाचारग्रस्त परभणीला भेट दिल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले की राहुल गांधी "नाटक आणि समाज भडकावण्यासाठी" परभणीत आले होते.

वंदे भारत ट्रेन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावेळी गाडीचा रस्ता चुकला. या संदर्भात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

शिवसेना यूबीटी नेत्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली शिवसेना यूबीटी नेत्यांनी सोमवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी नेत्यांनी मतदार यादीत समाविष्ट असलेल्या बनावट नावांबाबत निवेदनही दिले.

सोमवारी राहुल गांधी यांनी परभणीला भेट दिली, जिथे त्यांनी परभणी हिंसाचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील परभणी दौऱ्याचा बचाव करताना म्हटले की, गंभीर घटना घडलेल्या कोणत्याही ठिकाणी भेट देण्याचा राहुल गांधींना घटनात्मक अधिकार आहे.

पत्नीची हत्या करून अनेक वर्षे कायद्याच्या नजरेतून सुटलेल्या एका व्यक्तीला तब्बल 33 वर्षानंतर अटक केल्याची धक्कादायक बातमी नवी मुंबईतून समोर आली आहे. तसेच पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली 33 वर्षांपासून फरार असलेल्या या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.

महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.तसेच राज्यातील विभागाचे वाटप देखील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झाले. या नंतर काही नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होते. मात्र आता केबिनेटचे काही मंत्री नाराज सल्याचा बातम्या समोर येत आहे.

ठाण्याच्या पालघर मध्ये 21 वर्षांपूर्वीच्या दरोड्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी जालना जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

मुंबई किनारपट्टीवर नीलकमल या नौदलाच्या स्पीडबोटला अपघात होऊन 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांना वाचवण्यात यश मिळाले.अनेकांचा जीव वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा शिवसेना यूबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी गौरव केला.

फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या विरुद्ध ईडीने मनी लॉन्डरिंगच्या तपासाच्या अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिमच्या भावाच्या कथित साथीदाराच्या नावावर महाराष्ट्रातील ठाणे येथे 55 लाख रुपयांचा फ्लॅट ताब्यात घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बेकरी मालकांच्या संघटनेने मंगळवारपासून ब्रेडच्या (डबल रोटी) किमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्याची किंमत आता 20 रुपयांवरून 23 रुपये झाली आहे.

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

20 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पालघरमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यासह अन्य दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार, एका गावकऱ्याने तक्रार केली होती की वनक्षेत्रात असलेली त्याची जमीन परत मिळवण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी लाच मागितली जात होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.