Kazakhstan Plane Crash: कझाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना; प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, LIVE VIDEO VIRAL
Passenger plane crashes LIVE VIDEO: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे नागरिक फिरायला जात आहेत. सर्वत्र ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. कझाकस्तानमधील अक्ताऊ शहराजवळ एक प्रवासी विमान कोसळले. या विमानात 100 पेक्षा जास्त लोक होते असे सांगण्यात येत आहे. या अपघातातून 10 प्रवासी सुखरूप बचावल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र, जिवितहानी मोठी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कझाकिस्तानमधील अक्ताऊ विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली आहे. अपघातांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र विमान कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले आहे. या विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. रशियन वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. सांगितले जातेय की, हे विमान बाकूहून ग्रोंजी येथे जात होते. ग्रोंजी हे रशियातील चेचन्या प्रदेशात आहे.
अझरबैजान एअरलाईन्सने म्हटले की, अपघातग्रस्त विमान हे एंबरेयर 190 एअरक्राफ्ट होते. त्याचा क्रमांक J2-8243 असा होता. बाकू येथून विमान ग्रोंजी रूटवरुन विमान जाताना एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अक्ताऊ येथून तीन किलोमीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले.
रशियन न्यूज एजन्सीने सांगितले की, हे विमान अझरबैजान एअरलाईन्सचे होते आणि हे विमान रशियातील चेचन्या येथील बाकू येथून ग्रोंजीला जात होते. मात्र, धुक्यामुळे ते वळवण्यात आले. अद्याप या अपघाताबाबत अझरबैजान एअरलाईन्सकडून कोणतेही माहिती देण्यात आलेली नाहीये.
या अपघातात नेमके किती नुकसान झाले आहे तसेच जिवितहानी किंवा जखमींच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 10 प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
बातमी अपडेट होत आहे