Latest Maharashtra News Updates : नाशिक शहरासह जिल्ह्याला तीन दिवस 'येलो अलर्ट'; पावसासह गारपिटीचा इशारा
esakal December 25, 2024 03:45 PM
Nashik Rain LIVE : नाशिक शहरासह जिल्ह्याला तीन दिवस 'येलो अलर्ट'; पावसासह गारपिटीचा इशारा

- नाशिक शहरासह जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट

- गडगडाटी पावसासह गारपिटीचा देखील हवामान विभागाचा अंदाज

- नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवले चिंतेचे ढग

- रब्बी पिकासह इतर पिकांना धोका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

- गारपिटीचा धोका असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता

CM N Chandrababu Naidu LIVE : आंध्र प्रदेशचे CM चंद्राबाबू नायडूंकडून अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण

दिल्ली: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 'सदैव अटल' स्मारकावर पोहोचले आहे.

Nashik LIVE : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; बाजारभाव-वातावरणातील बदलाचा फटका

- एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात

- मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, कमी झालेली थंडी आणि धुक्याचा कांद्याला मोठा फटका

- लाल कांद्याची वाढ खुंटली, शेतातच कांदा करपायला सुरुवात

- कांद्याचं उत्पादन निम्म्याने घटलं, शेतकरी चिंताग्रस्त

- ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे फवारणीचा खर्च देखील वाढला

- कांद्यासाठी प्रती एकर शेतकऱ्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च

- मात्र नैसर्गिक बदलांमुळे उत्पादन घटल्याने उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

- आधीच कांद्याचे पडलेले भाव, त्यात अपरिपक्व कांद्याला बाजारात उठाव नसल्यानं मिळेल त्या कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Railway News : दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या 20 गाड्या धावताहेत उशिराने

दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या 20 गाड्या उशिराने धावत आहेत.

NDA Meeting LIVE : सत्ताधारी 'एनडीए'ची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक आज (ता. २५) दिल्लीत होणार आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या या बैठकीमध्ये ‘एनडीए’च्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहील. आंबेडकर अवमान प्रकरणावरून तापलेल्या वातावरणात ‘एनडीए’ची एकजूटता दर्शविण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प, विधानसभा निवडणुका तसेच ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ घटनादुरुस्ती विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल.

Nagpur Municipal Corporation LIVE : नागपूर महानगरपालिकेत लवकरच 245 पदासाठी भरती

नागपूर महानगरपालिकेत लवकरच 245 पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून 15 जानेवारीपर्यंत इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. पालिकेत दर महिन्याला 20 ते 30 कर्मचारी निवृत्त होत आहेत. या पदभरती प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण कमी होणार आहे.

Pune Accident LIVE : पुण्यात मद्यधुंद चालकाने दिली अनेक वाहनांना धडक

पुण्यात मद्यधुंद चालकाने अनेक वाहनांना धडक दिली आहे. दारूच्या नशेत एका चारचाकी चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. पुण्यातील मध्यवर्ती भागातून जात असलेल्या एका चारचाकी गाडीने रस्त्यावरून जात असलेल्या अनेक दुचाकींना उडवले आहे. दयानंद केदारी असे संशयित चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Christmas Festival LIVE : प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त जगभरात आज नाताळ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Latest Marathi Live Updates 25 December 2024 : प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त आज जगभरात नाताळ साजरा होत आहे. तसेच जवानांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन दरीत कोसळून किमान पाच जवानांचा मृत्यू झाला. जम्मू आणि काश्मीरमधील पूँच जिल्ह्यातील घारोआ येथे हा अपघात झाला. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक आज दिल्लीत होणार आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी होणाऱ्या या बैठकीमध्ये ‘एनडीए’च्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहील. आंबेडकर अवमान प्रकरणावरून तापलेल्या वातावरणात ‘एनडीए’ची एकजूटता दर्शविण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.