Allu Arjun : अल्लू अर्जुनची तीन तास चौकशी
esakal December 25, 2024 04:45 PM

हैदराबाद : चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन याची हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी तीन तास चौकशी केली.

हैदराबादमधील एका चित्रपटगृहात चार डिसेंबरला ‘पुष्पा-२’ हा चित्रपट सुरू असताना अभिनेता अल्लू अर्जुनने येथे भेट दिल्याने त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनसह त्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुन हा मंगळवारी दुपारी अकरा वाजता चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात हजर झाला.दुपारी पावणे तीन वाजता अल्लू अर्जुनची चौकशी संपल्याचे पोलिसांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.