मोठ्या बॅगमध्ये मुलीच्या मृतदेहाची कशी लावली विल्हेवाट? आरोपीच्या तिसऱ्या पत्नीने सगळंच सांगितलं! धक्कादायक खुलासा...
esakal December 26, 2024 04:45 AM

कल्याण: कल्याणमधील अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यानंतर आता अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? याबाबत तिने सांगितलं आहे. यामुळे आता तपासाला वेग आला आहे.

अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षीने सांगितलं की, मुलीला सायंकाळी पाच वाजता घरात घेतले. त्यावेळी विशाल गवळीने मुलीसोबत गैरकृत्य करून हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह टाकून ठेवला होता. आरोपीची पत्नी बँकेत नोकरी करत असल्याने संध्याकाळी 7 वाजता घरी आली. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून तिला धक्काच बसला.

मात्र नंतर 7 वाजता दोघे पती-पत्नी एकत्र बसून मृतदेहाचे काय करायचे याबद्दल योजना आखली. त्याआधी घरातील रक्त दोघांनी पुसून टाकले. रात्री 8.30 वाजता मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली. 9 वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. तिथे मृतदेह फेकून दोघे घरी परतले.

घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या गावी येथे निघून गेला. पत्नी साक्षी मात्र येथेच राहिली. मात्र घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालने हे कृत्य केल्याचा संशय आला. पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.