मध्य गाझामधील नुसिरतमधील अल-अवदा रुग्णालयाजवळ वाहनावर हल्ला झाल्याने पाच पत्रकारांचा मृत्यू झाला, असे एन्क्लेव्हमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात १७ बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणारराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात १७ बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Marathwada Live: मराठवाड्यात आजपासून पुढचे तीन दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाजमराठवाड्यात आजपासून पुढचे तीन दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. आज सकाळपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झाले नसल्याने पाऊस होण्याची चिन्हे आहेत. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहेत. वर्षांपासून रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Nashik: आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक ?महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक ?
- भाजपचा बडा मंत्री नाराज झाल्यानं कर्डिले यांची नियुक्ती थांबवल्याची चर्चा
- राहुल कर्डिले यांना दोनच दिवसांपूर्वी देण्यात आले होते नियुक्तीचे पत्र
Nashik: नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्धवस्त- नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्धवस्त
- दिंडोरी पोलिसांनी केली मोठी कारवाई
- दिंडोरीतील लॉजवर सुरू होता छापखाना
- प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी केला जप्त
Beed: संतोष देशमुख खुन, खंडणीसह चारही गुन्ह्यांचा तपास सिआयडीकडेसंसदेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या तसेच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी व पवनचक्कीवरील भांडणे या चारही प्रकरणांचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.