Goodbye 2024 Message In Marathi: सरत्या वर्षाला निरोप देऊ, जीवनगाणे पुन्हा नव्याने गाऊ... हे ह्रदयस्पर्शी संदेश पाठवून द्या 2024 ला निरोप
Heartfelt Bye-Bye 2024 Messages Quotes Images In Marathi: सरते वर्ष आता शेवटाकडे आले आहे. नव्या वर्षे 2025 काही दिवसांत सुरु होणार आहे. अशा परिस्थिती अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. नवीन वर्षाचे स्वागत अतिशय आनंदात आणि उत्साहात केले जाते. परंतु या काळात सरत्या वर्षाला देखील निरोप देणं गरजेचं असतं. कारण या एका वर्षाने आपल्याला अनेक आठवणी, आनंद आणि बरच काही दिलं आहे. या सर्व आठवणींची शिदोरी घेऊन नव्या वर्षात प्रवेश करूया. जुन्या वर्षाचं जड अंतरकरणाने निरोप घेताना नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करूया. येथे आम्ही सरत्या वर्षाला निरोप देणारे काही संदेश दिले आहेत. हे संदेश तुम्ही सोशल मीडियावर आणि तुमच्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत शेअर करू शकता.
गुडबाय 2024, हॅलो 2025!
नोव्हेंबर गेला, डिसेंबर संपला
पाहाता पाहता पूर्ण वर्ष सरले
काय मिळाले, काय गमावले
या वर्षातील सर्व आठवणींना सोबत घेऊ
नव्या वर्षात अतिशय उत्साहात प्रवेश करू
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
प्रत्येक वर्ष काहीतरी देऊन जातं
प्रत्येक नवीन वर्ष काहीतरी घेऊन येतं
चला तर, सरत्या वर्षाला निरोप देऊ
नव्या वर्षात नवे संकल्प हाती घेऊ
गुडबाय 2024, हॅलो 2025!
सरते वर्ष सर्वांपासून दूर जात आहे,
काय कराल, हाच निसर्गाचं नियम आहे
जुन्या आठवणींत चिंतेत राहू नका
नवीन वर्ष आनंदाने स्वीकारा!
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
2024 ने आनंद, दु:ख, मित्र खूप काही दिले
पण घड्याळाचा काटा कधी थांबत नाही
भविष्यात येणारी सर्व आव्हाने स्वीकारूया
चला 2024 ला आनंदाने मागे सोडूया
नवे वर्ष 2025 चं उत्साहत स्वागत करूया
गुडबाय 2024, हॅलो 2025!
सरत्या वर्षाला निरोप देतो
जीवनगाणे परत एकदा गातो
भूतकाळात थोडं निरखून बघतो
हरवलेलं स्वप्न मी परत साकारतो...
नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
समाप्ती ही नवीन सुरुवातीच्या आधी येते,
मग 2024 वर्षाचा शेवट का साजरा करू नये?
गुडबाय 2024, हॅलो 2025!
जसे जुने वर्ष आपल्याला मोलाचे अनुभव देते
तसेच नवे वर्ष नवीनसाठी मार्ग तयार करते
सरत्या वर्षाला निरोप देऊया
नव्या वर्षाचे स्वागत करूया
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
2024 चा निरोप घेताना या वर्षाने दिलेले
धडे, अनुभव आणि आठवणींची शिदोरी
मिठीत घेऊन 2025 मध्ये प्रवेश करूया
गुडबाय 2024, हॅलो 2025!
एक अध्याय बंद होणे ही
दुसऱ्या अध्यायाची सुरुवात असते
2024 ने खूप दिले असले तरी
2025 मधील नव्या संधी आणि
आव्हाने आपली वाट पाहत आहेत...
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
जुन्या वर्षाचा निरोप घेताना सर्व चुकीचे मागे सोडूया
2025 मध्ये अधिक मजबूत, समृद्ध, प्रगल्भ होऊया
नव्या वर्षातील नवीन साहसांसाठी सज्ज होऊ या...
गुडबाय 2024, हॅलो 2025!
वर्ष 2024 संपत आहे, परंतु 2025 मध्ये जाताना
असंख्य आठवणीची शिदोरी सोबत घेऊया
जड अंतरकरणाने सरत्या वर्षाचा निरोप घेऊया
नव्या वर्षाचं उत्साहाने स्वागत करूया
गुडबाय 2024, हॅलो 2025!
------------------------------------------------------
जुने झाले गेले सर्व वाईट विसरा
नवीन वर्षात नव्या उत्साहाने प्रवेश करा,
गुडबाय 2024, हॅलो 2025!