Thackeray group criticizes Modi government over price hike msj
Marathi December 27, 2024 03:25 PM


(SS UBT on Inflation) मुंबई : मागील वर्षभरात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर दुप्पट वाढले आहेत. महागाईवरून ज्यांनी 2014मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते त्यांच्याच दहा वर्षांच्या सत्ताकाळात माणसाला जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू महागच होत चालली आहे. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांचे रोजचे जगणेच महाग झाले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group criticizes Modi government over price hike)

सध्या दिवस ‘इयर एण्ड’ आणि नाताळच्या उत्सवी मूडचे आहेत, परंतु जनतेच्या या उत्साहावर महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने पाणी फेरले आहे. भाजीपाला तर महागलेला आहेच, परंतु रोजच्या जेवणात अत्यावश्यक असलेला लसूणही सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. लसणाचा किलोचा दर 400 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे जो लसूण आधी 40 रुपये किलो मिळत होता त्यासाठी आता 400 रुपये मोजण्याची वेळ सर्वसामान्य गृहिणींवर आली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Nana Patole : परभणी अन् बीड प्रकरणावरून पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, चौकशीतून…

स्वयंपाकाचा गॅस महाग, भाजीपाला 100 ते 125 रुपये प्रति किलो, लसूण 400 रुपये किलो, दूध, मसाले, गोडे तेल अशा सगळ्याच गोष्टींचे भाव आकाशाला भिडले आहेत. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची दरवाढ थांबायला तयार नाही. पोटासाठी चार घास तयार करायचे कसे, या विवंचनेत देशभरातील गृहिणी सापडल्या आहेत. केंद्रातील आणि राज्यातील राज्यकर्ते मात्र सत्तेचा ढेकर देत आरामात आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

– Advertisement –

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिम राष्ट्रांचे सर्वोच्च वगैरे पुरस्कार स्वीकारत फिरत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पाशवी बहुमताला कुरवाळत राज्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही ‘गरीबांना मोफत धान्य’ देतो असे म्हणत केंद्र सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर राज्य सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देतो असे म्हणत ढोल पिटत आहे. आम्ही मोफत धान्य दिले. आता ते कसे शिजवायचे, त्यात तेल, तिखट, मसाले, कांदा-लसूण टाकायचा की त्याशिवायच ते खायचे, भाज्या कशा घ्यायच्या हे तुमचे तुम्ही बघा असे केंद्राचे धोरण आहे, तर 1500 रुपयांत रोजच्या स्वयंपाकाचा कसा जुगाड करायचा ते तुमचे तुम्ही पहा. अर्धपोटी राहा, नाही तर उपाशी मरा, असा राज्य सरकारचा तोरा आहे, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने केली आहे. (SS UBT on Inflation: Thackeray group criticizes Modi government over price hike)

हेही वाचा – Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एसटी प्रवासात काय घडलं, पनवेल ते खोपोली प्रवास कसा होता


Edited by Manoj S. Joshi



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.