Manmohan Singh : मनमोहन सिंग यांना झाला होता फुप्फुसाचा संसर्ग, ही आहेत लक्षणे
Marathi December 28, 2024 09:24 AM

सबंध भारतीयांच्या मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आलीये ती म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. यावेळी एम्स रुग्णालयातील दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आलं… आणि मनमोहन सिंग यांची प्राणज्योत मालवली. नेमका लंग इन्फेक्शन अर्थात फुप्फुसांचा संसर्ग हा आजार आहे तरी काय

फुफ्फुसे आपल्या शरीरात ऑक्सिजनचा प्रवेश करण्यासाठी मदत करतात, रक्त शुद्ध करतात आणि श्वास फिल्टर करतात. पण जर एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसात व्हायरस, बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागली तर फुफ्फुसात संसर्ग होऊ लागतो. फुफ्फुसात हवेच्या पिशव्या असतात, ज्या संसर्ग झाला तर पू किंवा इतर द्रवाने भरतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

– जाहिरात –

फुफ्फुसाचा संसर्ग का होतो?

हा संसर्ग फुफ्फुसातील लहान वायूंच्या पिशव्यांमध्ये होऊ शकतो, याला न्यूमोनिया म्हणतात. याशिवाय, फुफ्फुसाच्या मोठ्या वायुमार्गात देखील संसर्ग होऊ शकतो, ज्याला ब्राँकायटिस म्हणतात.

फुफ्फुसाच्या संसर्गाचे प्रकार –

न्यूमोनिया
फ्लू
ब्राँकायटिस
टीबी

– जाहिरात –

फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे –

कफासह श्लेष्मल आणि रक्ताची समस्या.
श्वास घेण्यास त्रास होणे.
छातीत दुखणे.
घसा खवखवणे.
थोडे काम किंवा हालचालीने लवकर थकवा येणे.
मळमळ, उलट्या आणि हगवण.
हृदयाची गती वाढणे.

फुफ्फुसाचा संसर्ग कशामुळे होतो ?

फुफ्फुसाच्या संसर्गाची दोन मुख्य कारणे आहेत, व्हायरस आणि बॅक्टेरिया. जेव्हा रुग्ण श्वास घेतो तेव्हा हे जंतू फुफ्फुसात प्रवेश करतात आणि फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांमध्ये जमा होतात. यानंतर त्यांची संख्या वाढू लागते आणि ते जेव्हा अधिक वाढू लागतात, तेव्हा त्यामुळे संसर्ग होतो.

हे संसर्गजन्य देखील असू शकते, म्हणजेच खोकणे, बोलणे, शिंकणे इत्यादीद्वारे ते इतरांमध्ये पसरू शकते.

फुफ्फुसाचा संसर्ग वाढवणारे मुख्य घटक म्हणजे –

धूम्रपान
कारखान्यांमध्ये काम करणे
रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करणारे रोग
वृद्धापकाळ

फुफ्फुसाच्या संसर्गामध्ये काय खावे ?

हिरव्या पालेभाज्या :

हिरव्या भाज्यांपैकी तुम्ही ब्रोकोली, बीन्स, पालक इत्यादींचे सेवन करू शकता, हे तुमच्या फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे.

बीटरूट:

बीटरूटमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम इत्यादी अनेक आवश्यक पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात.

संत्रे :

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते.

सफरचंद :

सफरचंदात व्हिटॅमिन ई आणि सी पुरेशा प्रमाणात आढळते, जे फुफ्फुसाच्या संसर्गाशिवाय इतर रोगांसाठीही गुणकारी ठरू शकते.

पपई :

फुफ्फुसातील संसर्ग कमी करण्यासाठी पपई खूप चांगली मानली जाते. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करू शकता.

किवी:

किवी हे एक फळ आहे ज्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी किवी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. किवी रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासही मदत करते. किवीच्या सेवनाने फुफ्फुसातील संसर्ग हळूहळू कमी होतो.

टरबूज :

याच्या रसाचे सेवन केल्याने फुफ्फुसात साचलेली घाण निघून जाते.

पेरू :

वास्तविक, पेरू हे पोट साफ करण्यासाठी खूप फायदेशीर फळ मानले जाते. यामध्ये आढळणारे फायबर पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीच्या समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पेरू फुफ्फुसे स्वच्छ करण्याचेही काम करतो. तुम्ही सकाळी नियमितपणे एक पेरू खाऊ शकता.

फुफ्फुसाचा संसर्ग कसा टाळायचा ?

निरोगी आहाराचे नियमित सेवन करावे.
धूम्रपान थांबवावे.
भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे.
शुद्ध पाणी प्यावे.
एखाद्या गोष्टीचा ताण घेणे टाळा.
पुरेशी झोप घ्या.
नियमितपणे 30 मिनिटे व्यायाम करा.
प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करा.
स्वच्छता राखा.

फुफ्फुसाच्या संसर्गावर घरगुती उपाय काय आहेत?

फुफ्फुसात कफाची लक्षणे जाणवत असल्यास भरपूर पाणी प्या. त्यामुळे श्लेष्मल पातळ होऊन खोकल्याबरोबर बाहेर पडेल.

घसादुखी बरी होण्यासाठी मीठ आणि कोमट पाण्याने गुळण्या करा.

तुम्ही गरम पाण्याची वाफ घेऊ शकता. वाटल्यास त्यात थोडेसे मेन्थॉल देखील घालू शकता.

खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे कोमट पेय घेऊ शकता.

हेही वाचा : Tea Bag Disadvantages : तुम्ही टी बॅगचा चहा पिताय का?


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.