Gold Price: 2024 मध्ये सोन्याने दिले 27 टक्के रिटर्न्स, 2025 मध्ये काय होणार?
Times Now Marathi December 28, 2024 11:45 PM

Gold Price expectation in Year 2025: सोन्यात करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून वर्ष 2024 मध्ये 27 टक्क्यांचा परतावा गुंतवणुकदारांना मिळाला आहे. 2010 नंतर हा सर्वोत्तम परतावा आहे. आता 2025 मध्ये सोन्याची वाटचाल कशी असेल याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

2024 या वर्षात सोन्याचा दर 80 हजारांवर पोहोचला होता. सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सोन्याचे दर खूपच कमी झाले. ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळाला आणि स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली. पण 2024 या वर्षात सोन्याच्या दराने नवनवा उच्चांकी दर गाठला आणि गुंतवणुकदारांना तब्बल 27 टक्क्यांचा परतावा दिला. पण 2025 मध्ये सोन्याचे दर कुठपर्यंत पोहोचणार? 2024 प्रमाणे 2025 मध्ये सोने चांगले परतावा देईल का? 2025 मध्ये सोन्याच्या किमतीवर कोणते घटक परिणाम करतील? जाणून घेऊयात...

हे पण वाचा :

27 टक्क्यांचा परतावा2024 या वर्षात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 27 टक्क्यांचा परतावा मिळाला. 2010 नंतर हा सर्वोत्तम परतावा आहे. ही वाढ फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपात, भू-राजकीय जोखीम आणि महागाईपासून बचाव करण्यासाठी सोन्याची मागणी यामुळे झाली. तज्ञांच्या मते, या वर्षी सोन्याने विक्रम मोडले आणि एकूण मागणी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली. यासोबतच केंद्रीय बँकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले. भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा सोन्याची पाचपट अधिक खरेदी केली आहे.

हे पण वाचा :

2025 या वर्षात काय होईल?
सोन्याच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचा विश्वास आहे की, 2025 या वर्षात सोन्याचा दर प्रति औंस 3000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.

कोणते घटक परिणाम करतील?मध्य पूर्व आणि युक्रेनमधील तणाव तसेच अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे सोन्याची मागणी वाढू शकते. चलनवाढीमुळे, ईटीएफ गुंतवणूक आणि मध्यवर्ती बँकांकडून खरेदी सुरू राहील. अनिश्चित आर्थिक वातावरणात सोन्याची स्थिती मजबूत होईल. तसेच सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो त्यामुळे आगामी अनिश्चततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढू शकते.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.