उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
Inshorts Marathi December 27, 2024 03:45 AM

नवी दिल्ली, 26 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना पारंपारिक पैठणी शाल आणि पुष्पगुच्छ भेट दिली.

प्रधानमंत्र्यांच्या भेटीनंतर श्री. शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत, “ही भेट सदिच्छा भेट होती. तसेच, या भेटीत विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत श्री. मोदी यांच्याशी चर्चा केली. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.

या दौ-या दरम्यान उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट दिली. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि पारंपारिक शाल भेट स्वरुपात दिली.

0000

The post first appeared on .

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.