Camphor : आरोग्यवर्धक कापूर
Marathi December 27, 2024 07:25 PM
घरात पूजा करताना आरतीसाठी कापूर वापरण्यात येतो. धार्मिक कार्यात कापराचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो, कारण शुभ कार्यात कापूर जाळल्याने नकारात्मक उर्जा नष्ट होते असे म्हटले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून कापूर जाळणे उत्तम मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊयात, आरोग्यवर्धक कापराचे फायदे काय आहेत
कापराचे फायदे –
- कापराचा सुगंध वायरल इन्फेक्शनमुळे बंद झालेले नाक सुरळीत करते. जर तुम्हाला वायरल इन्फेक्शन झाले असेल तर कोमट पाण्यात कापून टाकून वाफ घ्यावी, आराम मिळतो.
- कापराचे तेल सांधेदुखीवर प्रभावी मानले जाते. जर पायांना- हातांना सुज येत असेल, दुखत असेल तर अशावेळी कापराच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर मानले जाते.
- कापराचा चहा प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो.
- कापराची पूड पाण्यात टाकून गुळण्या केल्यास मुखदुर्गंधी दूर होते.
- तापावर कापूर गुणकारी आहे. विड्याच्या पानासोबत कापूर दिल्यास ताप कमी होतो.
- कापूर आणि हिंग एकत्र घेतल्यास अतिसार, जुलाब कमी होतो.
- कापराच्या तेलासोबत खोबरेल तेल वापरणे उपयुक्त ठरेल. दोन्ही तेलातील गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळेल.
- कापूर केवळ शारीरिक व्याधीच नाही तर त्वचेसंबधित तक्रारी कमी करते.
- त्वचेवर होणारी जळजळ आणि पुरळ कापरामुळे कमी होऊ शकते.
- त्वचेवर फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कापराचे तेल लावणे उपयुक्त ठरेल.
- शरीराला सतत खाज येत असेल तर खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावल्याने खाजेपासून आराम मिळतो.
- केसांत कोंडा झाला असेल तर कापूर वापरणे फायद्याचे ठरेल. यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून केसांना लावल्याने केसातील कोंडा कमी होतो.
- केसगळती सुरू असेल तर कापराचे तेल केसांना लावायला हवे. या उपायामुळे केसगळती थांबेल.
- कापराचा सुगंध ताणतणावाच्या समस्येवर प्रभावी ठरेल. कापूर जाळल्याने मन शांत होऊन रिलॅक्स वाटते.
- कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मक उर्जा कमी होते.
- कापूर जाळल्याने घरात असणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घरातील वातावरण शुद्ध होते.
- कापरात असलेले एटिंसेप्टिक गुणधर्म शरीरावरील जखमा, व्रण बरे करू शकतात.
- दातदुखी सुरू असेल तर दातांमध्ये कापूर ठेवावा, यामुळे दातदुखीच्या वेदना कमी होतात.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे