Suger Factory Blast : बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन जण ठार
esakal December 27, 2024 05:45 AM

Jalna Latest News: माँ.बागेश्वरी साखर कारखान्याच्या सल्फर भट्टी चा स्फोट दोन कर्मचारी जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.२६) सायंकाळी घडली.

परतूर तालुक्यातील वरफळ येथील माँ बागेश्वरी साखर करखान्यात गुरुवारी (ता.२६) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सल्फर भट्टी चा स्फोट होऊन जूस सुपरवायझर आप्पासाहेब शंकर पारखे रा. सिरसगाव ता. परतूर वय ४५ वर्ष व सल्फटेशनमेट अशोक तेजराव देशमुख रा. राहेरी ता.सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा वय ५६ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.

तर नवनाथ पंढरपोटे वय ४० वर्ष रा. वरफळवाडी व कदिर युनूस पटेल वय ४१ वर्ष रा. वरफळ हे गंभीर जखमी झाले.परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता या दोन व्यक्तीला मयत घोषित करण्यात आले तर जखमी ना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानदेव नवल यांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.