Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान होते. काँग्रेसचे नेतृत्वाखाली तयार झालेल्या युपीए सरकारचे त्यांनी नेतृत्व केले.
यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी आत्ता पाकिस्तामध्ये असणाऱ्या पंजाबमधील गाह येथे झाला. त्यांच्या वडीलांचे गुरुमुख सिंग तर आईचे नाव अमृत कौर होते. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब अमृतसर येथे आले. मनमोहन सिंग यांचा 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग या तीन मुली आहेत.
शिक्षणमनमोहन सिंग यांनी हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले. स्काॅलर विद्यार्थी म्हणून ते परिचित होते. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीत नेहमीचा त्यांचा पहिला क्रमांक राहिला. त्यांनी अनुक्रमे 1952 आणि 1954 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले.
1957 मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी प्राप्त केली आणि 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल. पदवी पूर्ण केली. त्यानंतर ते भारतात परतले आणि 1966 ते 1969 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी त्यांनी काम केले.
अर्थशास्त्राचे प्राध्यापक ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर1969 मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले. 1972 मध्ये ते वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार झाले आणि 1976 मध्ये वित्त मंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. मनमोहन सिंग 1980-1982 मध्ये नियोजन आयोगात होते आणि 1982 मध्ये त्यांची माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर ते 1985 ते 1987 या काळात भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. 1991 मध्ये ते अध्यक्ष आणि नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले.
देशाचे 14 वे पंतप्रधान2004 मध्ये काँग्रेस प्रणित युपीए आघाडीने भाजप प्रणित एनडीएचा पराभव केला. त्यावेळी पंतप्रधान म्हणून सोनिया गांधी यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, विदेशी जन्माच्या मुद्यावरून त्यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला. तसेच पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली. देशाचे 14 पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी शपथ घेतली. 2009 मधील लोकसभा निवडणूकीत पुन्हा काँग्रेस प्रणित युपीएने विजय मिळवला तेव्हा सलग दुसऱ्यांदा मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 2004 ते 2014 असे सलग दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.
मनमोहन सिंह यांची वाटचाल1957 ते 1959 या काळात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता
1959 ते 1963 पर्यंत रीडर
1963 ते 1965 या काळात प्राध्यापक
1966 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
1966 ते 1969 पर्यंत UNCTD सोबत काम
1969 ते 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक म्हणून काम
ललित नारायण मिश्रा यांची विदेश व्यापार मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार
1976 मध्ये अर्थ मंत्रालयात सचिव
1976 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक
1976 ते 1980 या कालावधीत मनमोहन सिंग भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते.
1976 ते 1980 या कालावधीत भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक
1982 ते 1985 पर्यंत RBI चे गव्हर्नर
1985 ते 1987 या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
1987 ते 1990 पर्यंत मनमोहन सिंग यांनी दक्षिण आयोगाचे महासचिव
1991 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले.
2004 ते 2014 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते.