सोनं 63 हजारांवरुन 80 हजारांवर जाऊन आलं, सोन्यातील गुंतवणूक ठरली फायदेशीर, किती परतावा मिळाला?
Marathi December 27, 2024 05:25 PM

जळगाव : सरत्या वर्षात सोन्याच्या दराने 80 हजार रुपयांचा विक्रमी उंचीचा टप्पा गाठल्याचं पाहायला मिळालं आहे. 1 जानेवारी 2024 ला सोन्याचा दर 63 हजार रुपये होता तो सध्या 77 हजार रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या काळात सोन्यानं 22टक्के इतका परतावा दिला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात भारतीय बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने दरात 270 रुपयांची तेजी होती. सध्या 10 ग्रॅम सोनं 78000 रुपयांना मिळतेय. चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

सरत्या वर्षात सोन्याच्या दरात एकूण 1350  रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.तर याच वर्षात सोन्याच्या दराने विक्रमी उंची गाठत 80 हजार रुपयांचा टप्पा ही गाठल्याचे पाहायला मिळाले आहे. एकाच वर्षात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने,ग्राहक आणि सोने व्यावसायिकांना  यांना 22 टक्के परतावा मिळाल्याने ग्राहक आणि सोने व्यावसायिक यांच्या साठी सुवर्णसंधी ठरली असल्याचं पाहायला मिळाले आहे.

बाजारातील आजचं चित्र काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाला.मात्र देशांतर्गत बाजारात याचा परिणाम पाहायला मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण असली तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 98 रुपयांची तेजी होती. एमसीएक्सवर सोन्याचा दर 10 ग्रॅमला 76925 रुपयांवर होता. एमसीकएसवर चांदीचा दर 314 रुपयांनी वाढला. चांदीचा दर 89950 रुपये किलो आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 78150 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईचेन्नई आणि कोलकाता येथे सोन्याचा दर 270 रुपयांनी वाढला. या शहरांमध्ये 10 ग्रॅम सोनं 78000 रुपयांना मिळतंय. याशिवाय बंगळुरु, हैदराबाद,नागपूर 10 ग्रॅम सोन्याचा दर 78000 रुपये आहे.

अहमदाबादमध्ये सोन्याच्या दरात 220 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं  78000 रुपयांना मिळत आहे. दुसरीकडे चंदीगड, जयपूर आणि लखनऊमध्ये सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 78150 रुपयांना मिळतंय. तर, पाटणा शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा दर 78050 रुपये इतका आहे.

कमोडिटी बाजाराच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात येत्या काळात घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना या वर्षभरात 22 टक्के परतावा मिळाला असून 2025 मध्ये देखील तसाच परतावा मिळू शकतो.

इतर बातम्या :

Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.