Dr Manmohan Singh : तो काळ जेव्हा शायरीचं उत्तर शायरीच असायचं... मनमोहन सिंग अन् सुषमा स्वराज यांची शायराना जुगलबंदी होतेय व्हायरल
Mensxp December 27, 2024 06:45 PM

Dr Manmohan Singh : 

डॉक्टर मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळं अख्खा देश हळहळला. भारतीय राजकारणातलं एक उमदं व्यक्तीमत्व अन् अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. मनमोहन सिंग हे एक सॉफ्ट स्पोकन आणि विनम्र व्यक्ती होते. ते आपलं म्हणणं कमी शब्दात मात्र अत्यंत प्रभावीपणे मांडत होते. ते कायम हातचं राखून बोलायचे. 

मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते त्यावेळी संसदेत अनेक खासदार हे शेर-ओ-शायरीचा वापर आपल्या भाषणात करायचे. कमी शब्दात आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचं तसेच सभागृहाचं मनोरंजन करण्याचा यामागे उद्येश असायचा. यात तत्कालीन विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज आघाडीवर असायच्या. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग देखील यामध्ये मागे नसायचे. या दोघांची जुगलबंदी इतर खासदारही कान लावून ऐकत होते. त्यावेळी संसद आवाज असयाचा गोंधळ नाही. 

हेही वाचा :  Harshal Kumar Kshirsagar : महिन्याला १३ हजार कमावणाऱ्याने महाराष्ट्र सरकारचे २१ कोटी रूपये केले गायब; ४ बीएचके फ्लॅट गर्लफ्रेंडला केला गिफ्ट

सुषमा स्वराज यांनी केली सुरूवात 

Twitter

१५ व्या लोकसभेवेळी सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यामध्ये सतत वाकयुद्ध सुरू असायचं. त्यावेळी सुषमा स्वराज या मनमोहन सिंगांना शेर ओ शायरी मधून तिखट प्रश्न विचारायच्या. त्याला शांत अन् संयत मनमोहन सिंग देखील शायरीतूनच उत्तर द्यायचे. त्यांचे अनेक प्रसंगाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हम को उनसे वफा की हैं उम्मीद

१५ व्या लोकसभाचे सत्र सुरू असताना मनमोहन सिंग यांनी भाजपवर टीका करताना मिर्जा गालिब यांचा प्रसिद्ध शेर वाचला होता. ते म्हणाले होते की, 'हम को उनसे वफा की हैं उम्मीद, जो नहीं जानते वफा क्या हैं.' या उत्तरानंतर सुषमा स्वराज म्हणाल्या की शेर ओ शायरीचं उत्तर जर शर ओ शायरीतून नाही दिलं तर कर्ज तसेच राहील. 

त्यानंतर त्यांनी बशीर बद्र यांचा प्रसिद्ध शेर वाचला, त्या म्हणाल्या होत्या की, 'कुछ तो मजबुरिया रहीं होंगी यू ही कोई बेवफा नही होता.' त्यानंतर सुषमा यांनी दुसरा शेर वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, 'तुम्हे वफा याद नही हमे जफा याद नही, जिंदगी और मौत के दो ही तराने हैं एक तुम्हे याद नाही एक हमें याद नाही.' यानंतर संपूर्ण सभागृह हसू लागलं होतं. 

हेही वाचा : Manmohan Singh Passes away : देशाच्या इतिहासातील सुवर्णपान गळालं! आधुनिक भारताच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

ना इधर - उधर की तू बात कर

सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांच्यात २०११ मध्ये देखील जुगलबंदी झाली होती. मनमोहन सिंग यांनी इकबाल यांचा शेर वाचून आपलं म्हणणं मांडलं होतं. ते म्हणाले होते की, 'माना के तेरे दीद के काबिल नाही हूं मैं, तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख.' 

यावर सुषमा स्वराज यांनी देखील शेर द्वारेच उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, 'ना इधर - उधर की तू बात कर, ये बता काफिला क्यों लुटा, हमें रहजनो मे गिला नाही, तेरी रहबरी का सवाल हैं.' 

सध्याच्या घडीला भाजपच्या वरिष्ठ नेत्या राहिलेल्या सुषमा स्वराज देखील या जगात नाहीत अन् आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं देखील निधन झालं आहे. आता फक्त त्या जुन्या संसदेतील त्यांच्या दर्जेदार शेर ओ शायरीने समृद्ध झालेल्या आठवणी उरल्या आहेत. 


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.