Khoni Village bans Namaz for outsiders: कल्याण व आजूबाजूच्या शहरात महिलांवर होणारे अत्याचार, वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता खोणी ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. बाहेरील गावातील मुस्लिम धर्मियांना गावातील मज्जीद मध्ये नमाज पठण करण्यास यायला ग्रामस्थांनी बंदी घातली आहे.
शुक्रवारी बाहेरील गावातील मुस्लिम बांधव गावात आले असता त्यांना खोणी ग्रामस्थांनी पुन्हा माघारी धाडले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बदलापूर येथील मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण मध्ये देखील एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. महिला, लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून गुन्हेगारी देखील शहरी तसेच ग्रामीण भागात वाढली आहे.
यामुळे खबरदारी म्हणून खोणी गावातील ग्रामस्थांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. गावातील मध्ये बाहेरील मुस्लिम बांधवाना येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. दर शुक्रवारी येथे नमाज पठण करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने येतात.
मात्र आज सकाळी पासूनच मज्जीद कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. गावा बाहेरून आलेल्या बांधवाना पुन्हा माघारी पाठविण्यात येत होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानपाडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त गावात तैनात केला आहे.
याविषयी हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. आमच्या गावात प्रत्येक शुक्रवारी कमीत कमी दीड हजार मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी गावात येतात. आजूबाजूच्या शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, लव्ह जिहादची प्रकरण, लहान मुलींवर होणारे अत्याचार यामुळे गावांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमच्या गावची सुरक्षितता हीच आमची सुरक्षितता आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बाहेरून जे लोक येतात त्यांची दुसरीकडे व्यवस्था करा. स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा आमचा विरोध नाही. फक्त बाहेरच्या लोकांना गावात येण्यास बंदी केलेली आहे. आणि ही पुढेही करत राहणार प्रशासनाचे आम्हाला सहकार्य आहे, त्यांनी पुढे सहकार्य करावे अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.