राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. या घटनेनं पुणे हादरल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे थेट राजगुरूनगरमध्ये पोहचल्यात. नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती गोरे घेतायेत. त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणारे आहेत.
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसकमी दाबाच्या पट्ट्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसाचा गारपीट, पाऊस आणि वादळ वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.यवतमाळ,पुसद,आर्णी,उमरखेड या आधी तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तुर आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे उडाली नागरिकांची धांदलनंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात तुफान पाऊस...
गेल्या अर्ध्या तासापासून काकडदा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग......
हवामान खात्याने दिलेला येल्लो अलर्ट नंतर जोरदार पाऊस .....
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ....
अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता.....
पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात येणार घट....
Kalyan News : आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडल्याची घटनाभाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडल्याची घटना
कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
घटना सीसीटीव्हीत कैद दोन जणांनी बॅनर फाडल्याची माहिती
पोलीस तपास सुरू
rajgurunagar News : राजगुरुनगर दोन चिमुकल्या हत्या प्रकरणात आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडीराजगुरुनगर दोन चिमुकल्या बहिणींच्या हत्या प्रकरणातील आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
राजगुरुनगर येथील न्यायालयात आरोपीला आज हजर करण्यात आले होते.
दोन मुलींच्या हत्या प्रकरण फास्टर्टँक कोर्टात चालविण्यात येऊन आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली
Dombivli News : डोंबिवलीत भुयारी गटाराचे काम सुरु असताना झाड वीजेच्या तारेवर कोसळलेडोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड परिसरात धक्कादायक घटना
भुयारी गटाराचे काम सुरु असताना झाड वीजेच्या तारेवर कोसळले
जेसीबीने खोदला जात होता रस्ता
खाेदकामामुळे कोसळले झाड
घटना सीसीटीव्हीत कैद
सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
खोदकामा दरम्यान अशी घटना होऊ शकते
ठाकरे गटाचे पदाधिकारी राहूल चौधरी यांनी केली होती तक्रार
तक्रारीकडे केडीएमसी आणि वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
Pune News : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरुपुण्यामध्ये विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील रोहन फाळके याच्या खून प्रकरणातील आरोपी वाहतूक पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
Pune Crime News: गॅस सिलेंडरचा लाखो रुपयांचा काळाबाजार करणारी टोळी गजाआडजेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कर्नलवाडी गुळूंचे हद्दीत सत्यवान जगन्नाथ निगडे यांच्या बंद पडक्या प्लोट्री शेडमध्ये काही व्यक्ती विना परवाना घरगुती गॅसच्या टाक्या मधून कमर्शिअल (व्यापारी) गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. त्या माहितीच्या आधारे जेजुरी पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्तरित्या छापा टाकून कारवाई करत गॅस सिलेंडर चा मोठा साठा जप्त केला.
हडपसर परिसरातील तरुणांना टर्मिन इंजेक्शन पुरवणाऱ्या महिलेच्या घरावर पोलिसांची मोठी छापेमारी- छापेमारीत तब्बल एक लाख रुपये किमतीच्या 160 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या जप्त
- हडपसर परिसरातील अनेक अल्पवयीन तरुणांना आणि नागरिकांना टर्मिनच्या नशेबाज इंजेक्शनची विक्री करणार्या अंबिका ठाकूर या 26 वर्षे महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात
- एक टर्मिनची बाटली ही महिला 400 ते 500 रुपयाला विक्री करत असल्याची माहिती
Beed News: सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखलसीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल
सलग दुसऱ्या दिवशी अपर महासंचालक बीडमध्ये
CID चे अपर महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्याकडून आरोपींची चौकशी
आरोपी विष्णू चाटे यांची चौकशी सुरू
गेल्या काही वेळापूर्वी चौकशी सुरू
Mira-Bhayandar: मिरा भाईंदर पालिका मुख्यालयात कामगारांचे आंदोलनस्मशान भूमीत काम करणाऱ्या कामगाराच अतिरिक्त आयुक्त यांच्या दालना समोर आंदोलन
शहरातील १७ स्मशानात एकूण ५४ कामगार काम करत आहेत,१८ हजार पगार असताना १३ हजार मिळतो.
मिरा भाईंदरमध्ये आपल्या हक्काच्या पगारासाठी श्रमजीवी संघटनेच्या कामगारांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर यांच्या दालना बाहेर बसून आंदोलन केले.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाहीत असा इशारा दिला आहे.
Pune News: बँकेत अनागोंदी कारभार सूरू असल्याचा आरोप करत पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनंपुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनं
एस.टी. को ॲापरेटिव्ह बँकेत सूरू आसलेल्या गैव्यवहारप्रकरणी एसटी कर्मचारी आक्रमक
बँकेत अनागोंदी कारभार सूरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांच आंदोलनं
सहकार आयुक्त कर्यालावर कर्मचारी काढणार मोर्चा
शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने बँकेची सखोल चौकशी करून एकून २८ मुद्यांमध्ये सदावर्तेंच्या पॅनलला दोषी ठरवून संचालक मंडळावर कारवाई करावी आंदोलनं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी
Pandharpur: यल्लमा देवीच्या यात्रेसाठी दोन लाख भाविकांची गर्दीमहाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या कासेगाव येथील यल्लमादेवी यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली आहे.
आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेसाठी विविध राज्यातून यल्लमा देवीचे सर्व जग व जोगती ही मोठ्या संख्येने यात्रेसाठी आले आहेत. पंढरपुरातून एसटी महामंडळाने विशेष बस गाड्याची सोय केली आहे.
Pune News: आंदोलनात दोन गट... रास्तारोको मागे घेत पोलीस स्टेशनवर ठिया आंदोलन सुरुराजगुरुनगर मध्ये पुणे नाशिक महामार्ग रोखला आणि आंदोलकांच्या दोन गट पडल्याने अखेर मागे घेत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.
राजगुरुनगर शहरातील दोन चिमुकल्या मुलींच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी आणि पिडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखला.
मात्र या आंदोलनांमध्ये दोन गट पडत असल्याने अखेर महामार्गावरील रास्तारोको आंदोलन मागे घेत महामार्ग खुला केलाय.
Pune-Nashik Expressway: पुन्हा...! पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखलाराजगुरुनगर शहरातील दोन बहिणीच्या हत्यांकाड प्रकरणाचे पडसाद आज राजगुरुनगर शहरात पडत आहे.
राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पुणे नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखला असुन आरोपी फाशी देण्याची मागणी करत आंदोलक आक्रमक झाले असुन महिलांसह कार्यकर्ते महामार्गावर बसलेत...
Ahmednagar News: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, राहाता शहरात आंबेडकरी अनुयायांचा मोर्चाराहाता शहरात आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा...
परभणी येथील संविधान विटंबना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीतील मृत्यू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा...
काळे कपडे परिधान करून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी...
आंबेडकरी अनुयायांकडून अमित शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न...
मात्र पोलिसांनी तातडीने साहित्य घेतले ताब्यात...
मोर्चेकऱ्यांकडून नगर - मनमाड महामार्गावर ठिय्या...
अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...
Pune News: राजगुरूनगर प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी घेतली पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेटपुण्यातील राजगुरू नगर प्रकरणी रूपाली चाकणकर यांनी घेतली पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट
राजगुरुनगर मध्ये झालेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्ये प्रकरणी रूपाली चाकणकर पंकज देशमुख यांच्या भेटीला
बुधवारी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या बहिणींवर अतिप्रसंग करत करण्यात आली होती हत्या
या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अजय दास या आरोपीला केली आहे अटक
याच प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी रूपाली चाकणकर आज पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक
Nashik News: नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार- नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वीकारला आयुक्त पदाचा कार्यभार
- मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी
- नाशिक जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदांवर पती-पत्नी
- राजीव गांधी भवन येथील मनपाच्या मुख्यालयात मनीषा खत्री यांनी स्वीकारला पदभार
- अवघ्या ४८ तासांत राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री यांना देण्यात आली नियुक्ती
- मावळते मनपा आयुक्त अशोक करंजकर यांची कारकीर्द वादातीत
Wardha News: भाजपचे १ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान- भाजपचे १ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान
- वर्धा जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणीचा मानस
- एका बुथवर दोनशे सदस्य नोंदणीच उद्दीष्ट
- जिल्ह्यात १३४२ बुथवर सदस्य नोंदणी अभियान
- सक्रिय सदस्यकरिता 50 सदस्य नोंदणीचे लक्ष
- एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत चालणार नोंदणी अभियान
- पाच जानेवारीला मेगा ड्राईव्ह
- जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची माहिती
Nashik News: नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला- नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याचा लहान मुलावर हल्ला
- बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
- ऋषिकेश चंद्रे असं बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाचं नाव
- जखमी झालेल्या मुलावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
- सायंकाळी जखमी मुलगा आणि वडील रस्त्याने जात असताना बिबट्याने केला अचानक हल्ला
- वडिलांनी शर्थीने बिबट्याचा सामना करत मुलाची बिबट्याच्या हल्ल्यातून सुटका केल्याने मुलगा वाचला
- बिबट्याच्या हल्ल्यातील मुलाची प्रकृती मात्र चिंताजनक
महावितरण तर्फे लकी डिजिटल ग्राहक योजना, ऑनलाईन पद्धतीने बिल भरण्याचे आवाहन.महावितरण तर्फे लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु करण्यात आलेय. ग्राहकांचा ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ओढा वाढवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेय. पुढील वर्षी 1 जानेवारी ते 31 मे दरम्यान 3 पेक्षा अधिक महिन्याचे वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्याची संधि मिळणार असून रांगेत उभं राहण्यापेक्षा वेळ, श्रम आणि पैशाची बचत देखील यामुळे होणार आहे.
Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे बुकिंग फुल्लविठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे तीन महिन्यांसाठीचे काल पहिल्याच दिवशी बुकिंग फुल्ल झाले. नित्यपूजेतून विठ्ठलमंदिर समितीला तीन महिन्यात सुमारे 55 लाख इतर इतर सर्व पूज्यांमधून 1 कोटी 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
सर्वसामान्य भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी मंदिर समितीने कालपासून भाविकांसाठी घर बसल्या ऑनलाईन पध्दतीने पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध भागातील भाविकांनी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी केली.
Sunil Tatkare: पुढच्या तीन वर्षात सागरी महामार्गाच काम पुर्ण होणार - खा. सुनिल तटकरेमुंबई न्हावाशेवा अटल सेतुचे काम पूर्ण झाल्यानंतर आता कोकणवासियांना सागरी महामार्गाचे वेध लागले आहेत. या कामाला मंजुरी मिळाली असून पुलांच्या निविदा निघाल्या आहेत, रस्ताची आलांइनमेंट नक्की झाली आहे. भु संपदानच्या नोटीसा निघतील आणि पुढच्या तिन ते चार वर्षात कोकणचा सागरी मार्गा पुर्ण होईल अशी माहिती खा. सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम, 15 जणांना अटकबेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलीसांनी विशेष मोहीम राबवले आहे.
मागील दोन दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या बांगलादेशी नागरिकांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्डसह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलेत.
हे बांगलादेशी नागरिक भारतात कसे आले यांचा तपास आता पोलीस करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न असेल; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा सुतोवाचविधानसभा निवडणूक झाली. आता सर्वांना महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. लोकसभा, विधान सभा एकत्रित लढलो आता एकत्रित बसून आढावा घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न असेल असा सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे.
Amravati: अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती स्थळावर रोशनाईस्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचा 126 वा जयंती उत्सव साजरा होत आहे.
यानिमित्त अमरावती येथील पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती स्थळावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड गावात झाला होता.
कृषी व शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे योगदान पंजाबराव देशमुख यांचे आहे, तर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील पंचवटीमधल्या पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यावर करण्यात आलेल्या आकर्षक रोशनाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात यॅलो अलर्ट IMD ने गडगडाट आणि मुसळधार पावसाचा वर्तवला अंदाजभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
IMD च्या हवामान अंदाजानुसार, २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jalna News: जालन्यासाठी हवामान खात्याकडून पावसचा येलो अलर्ट जारीजालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट
जिल्हयात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
नागरिकांनी दक्षता घ्यावी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन