सन फार्मा, पीएफसी, भारत इलेक्ट्रॉनिक्ससह 6 शेअर्समध्ये अल्पवाधीसाठी गुंतवणुकीची संधी; दमदार परताव्यासाठी तज्ज्ञांची निवड
ET Marathi December 28, 2024 02:45 AM
मुंबई : आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत सन फार्मा, पीएफसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ल्युपिन, अपोलो टायर्स, देवयानी इंटरनॅशनल या शेअर्सचा सामावेश आहे. सन फार्माशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी Sun Pharma शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1,950 रुपये असून 1,800 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,864 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. पीएफसीशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी PFC शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 490 रुपये असून 457 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 453 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी BEL शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 490 रुपये असून 457 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 292 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. ल्युपिनशेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी Lupin शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2,300 रुपये असून 2,140 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,230 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.. अपोलो टायर्सशेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी Apollo Tyres शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 560 रुपये असून 532 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 536 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. देवयानी इंटरनॅशनलशेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा (सिनियर टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी Devyani International शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 190 रुपये असून 178 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 194 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)