Menstrual Cycle : या 5 ड्रिंक्समुळे पिरियड येतील रेग्युलर
Marathi December 28, 2024 03:24 PM

हल्ली अनियमित पिरीयड ही अनेक महिलांमध्ये जाणवणारी सामान्य समस्या झाली आहे. काही महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, जे पूर्णत: चुकीचे आहे. तुमची अनियमित पिरीयडची समस्या कालांतराने मोठ्या समस्येत रूपांतरीत होऊ शकते. त्यामुळे यावर वेळीच उपयार करणे आवश्यक आहे. अनियमित पिरीयड रेग्युलर करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती पेये पिणे फायद्याचे ठरेल. या पेयांनी पिरीयज वेळेत येतील शिवाय पोटदूखी, क्रॅम्स यापासून आराम मिळेल.

आल्याचा चहा –

आल्याच्या चहामध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे पिरीयड रेग्युलर होण्यास मदत मिळते. आल्याचा चहा बनवण्यासाठी आल्याचा किस तयार करून घ्यावा. तयार आल्याचा किस २ कप पाण्यात टाका आणि उकळवून घ्या. तयार चहामध्ये मध मिक्स करा. पिरीयड रेग्युलर करण्यासाठी नियमित हा चहा प्यावा.

हळदीचे दूध –

हळदीतील इन्फ्लेमेटरी आणि ऍटीऑक्सीडंट गुणधर्म पिरीयडच्या वेदना, क्रॅम्प्स कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. याशिवाय पिरीयड रेग्युलरही करतात.

अननासाचा रस –

अननासात ब्रोमेलॅन एन्झाइम आढळते. पिरीयडमधील वेदना आणि इररेग्युलर पिरीयड नियमित करण्यासाठी फायदेशीर असते. अनियमित पिरीयड नियमित करण्यासाठी दररोज १ कप अननसाचा रस प्यायला हवा.

डाळिंबाचा रस –

डाळिंबामध्ये असणारे भरपूर प्रमाणात ऍटी-ऑक्सिडंट पिरीयड रेग्युलर करण्यात फायदेशीर ठरतात. त्यामुळे पिरीयड नियमित करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायला हवा.

दालचिनी चहा –

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त असते. तुम्हाला जर PCOS ची समस्या असेल आणि पिरीयड वेळेवर येत नसतील तर दालचिनीचा चहा पिण्यास सुरूवात करावी.

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.