Palak Jowar Roti Recipe: सकाळी नाश्त्यात कोणता पदार्थ बनवावे हा प्रश्न महिलांना खुप पडतो. पालक पुरी, पालक सुप यासारखे पदार्थ खाऊन बोरं झाले असाल तर मुलांसाठी पौष्टिक पालक-ज्वारी थालिपीठ बनवू शकता. पालक-ज्वारी थालिपीठ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
पालक - ज्वारी रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य1 वाटी ज्वारी
बारिक चिरलेला पालक
छोटा कांदा
हिरव्या मिरच्या
मूग डाळ
ओवा
मीठ
पाणी
तेल
पालक - ज्वारी रोटी बनवण्याची कृतीपालक-ज्वारी थालिपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी बारिक चिरलेला पालक घ्या. नंतर बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली हिरवी मिरची, मूग डाळ,मीठ, ओवा, ज्वारीचे पीठ टाकून चांगले हाताने मळून घ्यावे. नंतर तवा गरम करून त्यावर तेल लावा. नंतर मिश्रणाचे छोटे थालिपीठ बनवून दोन्ही बाजून भाजून घ्यावे. तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.