आर्थिक नियोजन: अलिकडच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. भवष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी लोक आत्तापासूनच पैशांची गुंतवणूक करत आहेत. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आर्थिक नियोजन करणं महत्वाचं आहे. आज आपण कमी काळात श्रीमंत होण्यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत. पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी तुम्ही 50:30:20 चा फॉर्म्युला वापरु शकता. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
जर तुम्ही योग्य नियोजन करून पैसे खर्च करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 50:30:20 हा नियम तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. यामध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नाची तीन श्रेणींमध्ये विभागणी करणं गरजेचं आहे. उत्पन्नाची विभागणी गरजा, इच्छा आणि बचत या श्रेणींमध्ये केली जाते. अशा प्रकारे तुमच्या गरजाही पूर्ण होतात, इच्छाही अपूर्ण राहतात आणि गुंतवणूकही होते.
तुम्हाला मिळणाऱ्या पगारातील 50 टक्के रक्कम ही तुमच्या आवश्यक गरजांसाठी खर्च करा. यामध्ये घरभाडे, गृहकर्ज, कार कर्ज, आरोग्य विमा प्रीमियम, किराणा मालाची खरेदी यांचा समावेश आहे. जर तुमच्या गरजा तुमच्या उत्पन्नापेक्षा 50 टक्के जास्त असतील, तर तुम्ही राहण्याचा खर्च कमी करून जास्त पैसे वाचवू शकता.
एखादी व्यक्ती केवळ त्याच्या गरजांसाठीच नाही तर आपले छंद पूर्ण करण्यासाठी किंवा जीवनशैली सुधारण्यासाठी देखील पैसे खर्च करते. यामध्ये आउटिंग, बाहेर डिनर, चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणे, ब्रँडेड वस्तू किंवा गॅझेट्स खरेदी करणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये अतिशय काळजीपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे. जेणेकरुन आपण जास्त खर्च करू नये. यासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 30 टक्के खर्च करू शकता.
आणीबाणीच्या परिस्थितीसाठी पैसे वाचवले जातात जेणेकरुन जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला खर्चाचा जास्त विचार करावा लागत नाही. तुम्हाला कोणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्ही 20 टक्के रक्कम एसआयपीमध्ये जमा करु शकता. यामध्ये तुम्ही एखादी पॉलिसी खरेदी करू शकता किंवा आपत्कालीन निधी म्हणून गोळा करू शकता.
अधिक पाहा..