नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज शिमल्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) साहाय्यक संचालकाच्या घरी छापे घालत झाडाझडती घेतली. तपास यंत्रणेने मागील रविवारी या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला होता पण तो यंत्रणेला गुंगारा देण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘ईडी’चा साहाय्यक संचालक असलेल्या या अधिकाऱ्याची सिमला येथे नियुक्ती करण्यात आली होती त्याचा भाऊ विकास दीप हा दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेमध्ये काम करतो. संबंधित अधिकारी आणि त्याचा भाऊ एका उद्योजकाकडून लाचेचे पैसे घेण्यासाठी चंडीगडला गेले होते, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

एका उद्योजकानेच ‘ईडी’शी संबंधित अधिकाऱ्याविरोधात ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल केली होती.‘सीबीयाआय’ने या अधिकाऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. ‘ईडी’च्या लाचखोर अधिकाऱ्याने त्या व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि उत्पादनशुल्क विभागात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याची सध्या ‘ईडी’मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.