शुभम देशमुख
भंडारा : पट्टेदार वाघांची संख्या कमी आहे. यात भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या पट्टेदार वाघाचा मृत्यू कशामुळे झाला आहे. याचे कारण समोर आले नसून शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजू शकणार आहे.
भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्र असलेल्या परिसरातील देवनारा ते चिखली मार्गावरील राखीव वनातील देवनारा तलावाजवळ कक्ष क्रमांक ६२ मध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेने त मोठी खळबळ उडाली आहे. मृत वाघ हा नर प्रजातीचा असून तो दीड वर्षाचा आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवाल नंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांना दिसला वाघ
दरम्यान देवनारा येथील तलावाजवळ शंकरपट बघायला गेलेल्या नागरिकांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांना वाघ जमिनीवर पडलेला दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले होते. मात्र त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता वाघ मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
रामकुंड परिसरात बिबट्याचा गाईवर हल्ला
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासुन ने धुमाकूळ घातला आहे. सातत्याने बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच भुम तालुक्यातील रामकुंड गावठाण तळ्याच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये बिबट्याने शेतकरी सुदाम हाके यांच्या गाईवर हल्ला केल्याची घटना रात्री घडली. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. दरम्यान बिबट्याच्या सुरू असलेल्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.