January Bank Holiday List: जानेवारीत 15 दिवस बॅंका बंद राहणार, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Times Now Marathi December 29, 2024 06:45 PM

List: जानेवारी 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अंदाजे 15 बँक सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि इतर काही सणांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया () ची अधिकृत सुट्ट्यांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र ही यादी तुम्हाला तुमचे वेळापत्रक ठरवताना फायदेशीर ठरु शकते. जानेवारीतील 15 सुट्ट्या नेमक्या कधी आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

जानेवारी या दिवशी बँका बंद राहणार

  • 1 जानेवारी : नवीन वर्षाच्या दिवशी देशभरात बँकेला सुट्टी असेल.
  • 5 जानेवारी : रविवार निमित्त देशभरात बँकेला सुट्टी असेल.
  • 6 जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती निमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 11 जानेवारी: मिशनरी दिनानिमित्त मिझोराममध्ये बँकेला सुट्टी असेल. तसेच, दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
  • 12 जानेवारी: पश्चिम बंगालमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
  • 13 जानेवारी: लोहरी सणानिमित्त पंजाब आणि इतर काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 14 जानेवारी : अनेक राज्यांमध्ये संक्रांती आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँका बंद राहतील.
  • 15 जानेवारी: तिरुवल्लुवर दिवस पाळण्यासाठी तमिळनाडूमध्ये आणि तुसू पूजेमुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँका बंद राहतील.
  • 16 जानेवारी: उज्जावर तिरुनालमुळे काही राज्यातील बॅंका बंद राहतील.
  • 19 जानेवारी : रविवार निमित्त देशभरात बँकेला सुट्टी असेल.
  • 22 जानेवारी: इमोइनमुळे काही राज्यांमध्ये बॅंकेला सुट्टी असेल.
  • 23 जानेवारी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 जानेवारी: भारतभर बँका बंद राहतील, शनिवार हा महिन्याचा चौथा शनिवार आहे.
  • 26 जानेवारी: प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
  • 30 जानेवारी: सोनम लोसारमुळे सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.




बँका बंद पण आर्थिक व्यवहार सुरू राहणार

जानेवारी 2025 मध्ये भारतातील विविध भागात वरील प्रमुख सण साजरे केले जाणार आहेत. वरील तारखांना बँका बंद राहणार आहेत. मात्र इंटरनेट बॅंकिंग आणि एटीएम दैनंदिन व्यवहारांसाठी वापरता येतील. तसेच UPI पेमेंट म्हणजे फोनपे, गुगल पे आणि इतर सुविधा मात्र सुरु राहणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.