हिवाळ्यात फिरायला जायची मज्जा काही वेगळीच असते. या दिवसात बऱ्याच सुट्या असल्यामुळे आपण कुटूंब किंवा मित्रपरिवारासह कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतो. तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळतो. या सहलीमुळे आपलं माईंड देखील रिफ्रेश होते. हिवाळ्यात फिरायला जाताना आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा आपण आऊटिंगला जाताना काही चुका करतो. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात आऊटिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी.
हिवाळ्यात कुठेही लांब प्रवास करताना बॅगमध्ये स्वेटर आणि जॅकेटसारखे उबदार कपडे ठेवा. तसेच तापमानानुसार बूट, मफलर आणि टोपी सोबत ठेवा.
– जाहिरात –
तुम्ही ज्या भागात फिरायला जात आहात त्या भागात वाहतूक सुरक्षितता आहे का हे तपासून घ्या. बऱ्याच ठिकाणी वाहतूक सुरक्षिता नसते. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासून घ्या.
प्रवास करण्यापूर्वी हवामान अहवाल तपासून घ्या. ज्या भागात फिरायला जाणार असाल त्या भागाची हवामानाची माहिती घ्या. बर्फवृष्टी, वादळ किंवा इतर आपत्तीची परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेऊन. त्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करा.
– जाहिरात –
हिवाळ्यात वातावरण खूप थंड असते. त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील कमकुवत असते त्यामुळे आपण सहजपणे आजारी पडू शकतो . हिवाळ्यात कुठेही फिरायला जाताना सोबत मेडिकल किट ठेवा.
हिवाळ्यात कुठेही फिरायला जाताना आपण स्वेटरवरच घालतो, स्वेटरवर अवलंबून राहू नका. लेयरिंग किंवा इनर थर्मल, स्वेटर, आणि जॅकेट घाला.हवामानाच्या अनुकूल स्कार्फ, ग्लोव्ह्ज, कॅप, आणि वूलन सॉक्स घाला.
स्लीपर किंवा सरळ , साधे शूज वापरल्यास पाय गाठू शकतात. वॉटरप्रूफ आणि उष्णता देणारे शूज वापरा.
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपण कमी पाणी पितो. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
हेही वाचा : Mumbai Travel Destination : थंडीत मुंबईच्या या ठिकाणांना भेट द्या
संपादन : प्राची मांजरेकर