रेल्वे रुळांवर सिलेंडर: उरूळी कांचन इथं आज एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वेच्या रुळावर ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. उरुळी कांचनच्या हद्दीत काल (ता.29) रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून तपासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सूचना केल्या.याप्रकरणी रेल्वेचे लोको पायलट शरद शहाजी वाळके, (वय 38 ) यांनी फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलट शरद वाळके हे नेहमीनुसार रविवारी (ता.29) रात्री आपल्या हद्दीतील रेल्वे मार्गाची पाहणी करत होते. त्यांना रात्री पावणे अकराच्या सुमारास उरूळी कांचनच्या हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर (रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर 219/7-5) प्रिया गोल्ड कंपनी गॅसचा सिलेंडर आढळला. त्यांनी ते सिलेंडर उचलण्याचा प्रयत्न केला असता, सिलेंडरमध्ये गॅस (3900 किं ग्रॅम वजन) असल्याचे लक्षात आले. तत्काळ वाळके यांनी ते सिलेंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडविण्याचा कट उधळून लावला.
शरद वाळके यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना व वरीष्ठांना दिली. त्यानुसार उरूळी कांचन पोलिसांनी रेल्वेच्या कलम 150, 152 नुसार अज्ञात व्यक्तीवर घातपाताचा घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळास भेट दिली. अधिक तपास उरूळी कांचन पोलिस करत आहेत.
दरम्यान, रात्री पावणे 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, या प्रकरणी पोलिस सतर्क झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञाताविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..