Cough Home Remedy: घशात खवखव होतेय? या 4 नैसर्गिक उपयांनी लगेच मिळेल आराम
Times Now Marathi December 31, 2024 05:45 AM

Home Remedies For Cough: हिवाळ्यात थंडीमुळे अनेक प्रकारचे आजार फैलावतात. यात सर्दी आणि खोकला ही सामान्य समस्या असते. या काळात संसर्गामुळे अनेकांना घसा दुखणे किंवा खवखवण्याची समस्या जाणवते. घसा खवखवणे खूप सामान्य वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यामुळे खूप वेदना होतात. यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण औषधांची मदतही घेतात. परंतु यातूनही अनेकांना आराम मिळत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय तुमच्या कामी येऊ शकतात.


हिवाळ्यात आरोग्यासोबतच आहाराचीही काळझी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण या काळात आपण जे खातो आणि पितो त्याचा आरोग्यावर झटपट परिणाम होऊ शकतो. तुम्हालाही या काळात घशात खवखवीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही गरम सूपपासून ते हर्बल टीपर्यंत काही घरगुती उपाय करून पाहू शकता. या उपायामुळे तुमच्या घशाला आराम मिळण्यास मदत होईल. येथे आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत. हे केल्यास तुमच्या घशातील खवखव कमी होईल आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास देखील मदत होईल.


हर्बल चहा (Herbal tea)
तुम्हाला घसा खवखवणे आणि घशात वेदना होत असतील तर तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. घसा खवखवल्यास दररोज कॅमोमाइल, आले किंवा तुळशीचा चहा घ्या. कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते सूज आणि चिडचिड कमी करण्यास मदत करते. आल्याच्या चाहात असलेले जिंजरॉल वेदना आणि संसर्गाशी लढा देण्यास मदत करते. तसेच तुळशीचा चहा घशाला आरम देण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतो.


गरम सूप (Hot soup)
हिवाळ्यात भाज्यांचे किंवा चिकन सूप प्या. यामुळे तुमच्या घशालाही आराम मिळेल. कोमट द्रव प्यायल्याने घसा ओलसर ठेवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत होईल. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल. चिकन सूपमध्ये सिस्टीनसारखे अमीनो ॲसिड असते जे श्लेष्मा पातळ करते. यामुळे तुमचा कफ दूर होण्यास मदत होते. तसेच भाजीपाला सूप हायड्रेशन आणि आवश्यक जीवनसत्त्वे प्रदान करते. त्यामुले रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत होते.



अन्न चुरून खा (Mashed food)
तुम्हाला त्रास असेल आणि घसा खूप दुखत असेल तर तुम्ही मऊ, मॅश केलेले अन्न खावे. हे गिळण्यास अतिशय सोपे असते. अशा वेळी आहारात खिचडी किंवा दलिया अशा पदार्थांचा समावेश करा. यात असलेले अनेक प्रकारचे पोषक घटक घशाला आरम देण्यास आणि बरा होण्यास मदत करतात.



काकडी (Cucumber)
काकडी खाल्ल्याने घसा खवखवल्यास आराम मिळतो. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते जे घसा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त काकडीचा थंड प्रभाव जळजळ शांत होण्यास मदत करतो.


(डिस्क्लेमर: या लेखात दिलेला मजकूर ही उपलब्ध माहिती आहे. हा तज्ञांचा सल्ला नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.