Vel Amavasya : कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारा सण ' येळवस '..
esakal December 31, 2024 05:45 AM
Vel Amavasya शेतातील लक्ष्मीचे पूजन ...

वेळ अमावस्येला शेतकरी आपल्या शेतातील लक्ष्मीचे पूजन करून रब्बी हंगामात बरकत येण्यासाठी प्रार्थना करतो .

Vel Amavasya काळ्या आईबद्दल कृतज्ञता .....

ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि काळ्या आईच्या पूजेचा हा उत्सव. तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

Vel Amavasya वातावरणाला अनुकूल असे भोजन ...

हिवाळ्यात साजरा होणाऱ्या या सणासाठी केले जाणारे पदार्थ सुद्धा वातावरणाला अनुकूल असेच असतात. विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून केलेली भज्जी, आंबील, रोडगा , गुळ घालून बनवलेली खीर, तिळाच्या रोट्या असे शरीराला उष्णता देणारे पदार्थ बनवले जातात.

Vel Amavasya ग्रामिण एकोप्याचे दर्शन..

या दिवशी लोक एकत्र सहभोजनाचा आनंद घेतात . ज्या लोकांना शेती नसेल त्याना शेतकरी आपल्या शेतात बोलवून जेवू घालतात.

Vel Amavasya कृषी क्षेत्राशी नाळ जोडणारा उत्साव ..

वेळ अमावस्येला शहरी भागात राहणारे अनेक लोक हा सण साजरा करण्यासाठी गावाकडे जातात. शहरात जाऊन कृषी क्षेत्राशी तुटत जाणारी नाळ जोडून ठेवण्यात हा उत्सव महत्त्वाचा आहे. नव्या पिढीला ग्रामीण संस्कृतीशी हा सण जोडतो.

non veg benefits
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.