नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Marathi December 31, 2024 06:24 AM

नवीन नियम 2025 नवी दिल्ली: 2024 संपून 2025 सुरु होण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. नव्या वर्षासह काही नियमांमध्ये बदल लागू होणार आहेत. या नियमांचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय नागरिकांना बदलत्या नियमांमुळं नागरिकांचं अर्थकारण देखील बदलणार आहे. या मध्ये कारच्या किंमती, एलपीजी सिलेंडरच्या किंमती, पेन्शन संदर्भातील नियम, अमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि यूपीआय 123 पे चे नियम आणि एफडी संदर्भातील नियमांचा समावेश आहे.

1. कारच्या किंमती वाढणार

नव्या वर्षात कार खरेदी करणं महाग होणार आहे. 1 जानेवारी 2025 मध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेन्झ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या ऑटोमोबाइल कंपन्या कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढवतील.  कंपन्यांकडून उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं दरवाढ करत असल्याचं कारण सांगितलं आहे. जर, तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला अधिक खर्च करावा लागेल.

2. एलपीजी सिलेंडरचे दर

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलपीजीच्या दराचा आढावा घेत असतात. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात (14.2 किलो) च्या दरात गेल्या काही महिन्यांपासून बदल झालेला नाही. दिल्लीत या सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरात यापूर्वी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 73.58 डॉलर प्रतिबॅरल आहेत. यामध्ये बदल होऊ शकतात.

3.पेन्शन संदर्भातील नियम बदलणार

नव वर्षात पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं नियम सरळ केले आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात. यासाठी त्यांना अतिरिक्त पडताळणी करण्याची आवश्यकता नसेल. पेन्शनधारकांना यामुळं मोठा दिलासा मिळेल.

4. अमेझॉन प्राइम मेम्बरशिपचे नियम बदलणार

अमेझॉन प्राइम मेम्बरशिपचे नियम बदलले जाणार आहेत. 1 जानेवारी 2025 पासून नव्या नियमानुसार प्राइम अकाऊंटवरुन केवळ दोन टीव्हीवर प्राइम व्हिडीओचं स्ट्रीमिंग केलं जाऊ शकतं. तिसऱ्या टीव्हीवर प्राइम व्हिडीओ पाहायचा असल्यास अतिरिक्त सबसक्रिप्शन घ्यावं लागेल. आतापर्यंत प्राइम मेंबर एका खात्यावरुन पाच फोनवर व्हिडीओ पाहू शकत होते.

5. FD चे नियम बदलणार

RBI ने NBFCs आणि HFCs साठी मुदत ठेवीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांची अंमलबदावणी 1 जानेवारी 2025 पासून केली जाणार आहे. या बदलांमध्ये मुदत ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनतेकडून ठेवी स्वीकारणे, ठेवीचा विमा काढण्या सारखे बदल सुरु आहेत.

6. यूपीआय 123 पेवर व्यवहार मर्यादेत वाढ

फीचर फोन वापरकर्त्यांसाठी रिझर्व्ह ऑफ इंडिया (RBI)नं यूपीआय 123 पे सेवा सुरु केली आहे. याच्या व्यवहार मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. पहिल्यांदा या सेवेनुसार 5 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येत होते. आता ही मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून वाढवून 10 हजार रुपये केली जाणार आहे.

इतर बातम्या :

करोडपती व्हायचंय? नवीन वर्षात महिना फक्त 5000 रुपयांची बचत करा, इतक्या दिवसात व्हाल करोडपती

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.