Maharashtra Live Update: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडसह शेतकरी रस्त्यावर
Saam TV January 01, 2025 09:45 PM
Sambhaji Brigade: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडसह शेतकरी रस्त्यावर

बुलढाण्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. संभाजी ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाठिंबा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर खाऊन आंदोलन केले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिदुर्गम पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अतिदुर्गम पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात नागरिकांना संबोधित केले. तसेच आदिवासी नागरिकांना विविध साहित्याचे वाटपही केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या भेटी दरम्यान त्यांनी दुर्गम भागात कार्यरत पोलीस जवानांसोबत चर्चा करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Maratha Aarakshan: 25 जानेवारी पासून पुन्हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू...

आंदोलन मिळणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा.

अँकर:- मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन म्हणून तरंगे पाटील आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारला आहे 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत मला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाने यावं असं आवाहन नांदेडच्या लोहा येथे केलं. नांदेडच्या लोहा येथे मराठा आरक्षण संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मनोज रंगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केला आहे. आपल्याकडे जे वाहन मिळेल त्या वाहनाने 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे येण्याचे त्यांनी आवाहन केलं आहे. पूर्वी ते सरकार होतं आता पण तेच सरकार आहे. पूर्वी टोलवाटोल इथे खेळत होते. आता मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना कोणीही आरक्षण देण्यासाठी अडथळा आणणार नाही. तर 25 जानेवारीला मराठा आरक्षणाचा प्रश्न ते मार्गी लावतील. जर त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी द्वेष असेल तर ते मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढणार नाहीत. त्यांना राज्यात सुद्धा फिरू देणार नाही. आपल्या जातीच्या लेकरासाठी एक दिवस काम सोडून 25 जानेवारीला अंतरवाली सराटी येथे यावं.असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी..गर्दीमुळे कार्ला गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणावळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरात भक्तांची गर्दी पहायला मिळत आहे. आगरी, कोळी समाजाची श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र भरातून भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. कार्ला येथे मोठी गर्दी झाल्याने कार्ला कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही लेनवर गाड्यांची संख्या मोठी असल्याने वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस कार्ला येथील वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत असून लवकरच वाहतूक कोंडी सुटेल अस पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

भिमा कोरेगाव विजय दिनानिमित्ताने मनमाड मध्ये आंबेडकर अनुयायी चे अभिवादन

मनमाड शहरात बहुजन पार्टी तर्फे कोरेगाव विजय दिन साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती,यावेळी शहरातील समस्त अंबेडकर अनुयायांनी भिमा कोरेगाव युद्धातील शूरविर सैनिकांना अभिवादन करत मानवंदना दिली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नांदेडच्या लोहा येथे आगमन. मराठा आरक्षण संवाद बैठकीला करणार संबोधित राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याची कमी किंमतीत पोर्टर अँपच्या माध्यमातून तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केलाय. यामध्ये पोर्टर अँपच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये उच्चप्रतीच्या स्कॉच व्हिस्कीच्या 19 बॉटल मिळून आल्या. तर हे मद्य कोपरखैरणे येथील एका घरातून आणले असल्याची माहिती मिळताच त्याघरावर देखील उत्पादन शुल्क विभागातर्फे छापा टाकण्यात आला. याठिकाणी विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याला सील करण्याचे कामं सुरु होते. येथून उच्च प्रतीच्या विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बूच आणि लेबल असे साहित्य जप्त करण्यात आले असून या कारवाईत तब्बल 7 लाख 52 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी 2 आरोपीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

बाबू आर.एन. सिंह यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम

उत्तर भारतीय संघ भवनाचे स्वप्न साकार करणारे, आधुनिक उत्तर भारतीय संघाचे निर्माते, माजी भाजप आमदार आणि उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष बाबू आर.एन. सिंह यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील उत्तर भारतीय संघ भवनात संपन्न झाला.

Maharashtra Live Update: पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मसाजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन मागे

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन तासापासून सुरू असलेलं मस्साजोगच्या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन मागं घेण्यात आले आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपला आंदोलन मागं घेतलं. दरम्यान दहा दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी पोलिसांना दिला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सकाळपासून गावाजवळील तलावात जलसमाधी आंदोलन करायला सुरुवात केली होती. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होत्या.

Maharashtra Live Update: वैभववाडी तालुक्यात बांधकाम सुरू असलेल्या एका घरावर बिबट्याचे दर्शन झाले आहे. हा बिबट्या घराच्या भिंतीवर बसलेला व्हिडिओत दिसून येत आहे. बिबट्याचे भर वस्तीत दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा अपघाती मृत्यू

पोलीस उपनिरीक्षक गिरनार हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशनला होते. तेथून त्यांची बदली महाळुंगे पोलीस स्टेशनला झाली. रात्रपाळी करून घरी परत निघालेल्या गिरनार यांच्या कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन करणाऱ्या महिलेला पाण्यातच आली चक्कर

चक्कर आलेली महिला तासाभरापासून करत होती पाण्यात उभारून आंदोलन.

प्रभावती भिमराव सोळंके असं चक्कर आलेल्या महिलेचे नाव.

महिलेला उपचारासाठी नेण्यात आलं रुग्णालयात.

आंदोलकांनी काढले महिलेला पाण्याबाहेर. पोलीस व महसूल प्रशासनाची बघायची भूमिका.

सरपंच संतोष देशमुख यांच्या उर्वरित मारेकर्यांना अटक करा या मागणीसाठी मस्सा जो ग्रामस्थांचं सुरू आहे दीड तासापासून जलसमाधी आंदोलन

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात..

- वरिष्ठ सी आयडीचे अधिकारी करत आहेत चौकशी.

- खंडणी प्रकरणातील फरार असलेला आरोपी संदर्भात सीआयडी कडून विचारणा..

- आज दिवसभर सीआयडी कडून होणार चौकशी. कोण कोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं..

मस्साजोग येथील जलसमाधी आंदोलनस्थळी तहसीलदारांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल

आंदोलकांना पाण्याच्या बाहेर निघण्याची केली जात आहे विनंती

मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम..

कोरेगाव भीमा परिसरात सीसीटिव्ही ची करडी नजर

कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभावर आज २०७ वा शौर्यदिन साजरा होतोय या निमित्ताने लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगाव भिमात दाखल होत असुन चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे नगर मार्गासह विजयस्तंभ परिसरात सीसीटिव्ही कँमेराच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जातेय चोरी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस अलर्टमोडवर आहे

Beed News : सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी

बीड: सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी

फरार तिन्ही आरोपीच्या नातेवकांची सीआयडी च्या अधिकाऱ्यांन कडून कसून चवकाशी झाल्याची सूत्रांची माहिती

नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का याचा ही तपास सीआयडी कडून होत असल्याची माहिती

सीआयडी कडून तिन्ही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न सुरू

बीडच्या मस्साजोग येथे आज गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज मस्साजोग ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.

Maharashtra Live Update: उद्धव ठाकरे शुक्रवारी मस्साजोगला जाणार Maharashtra Live Update: बीड : सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुले वर

सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार

सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत.

वाल्मीक कराडच्या नंतर तपास यंत्रणांचा फोकस तीन फरार आरोपीवर

माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

सांगली पोलिसांचा मद्यापी, हुल्लडबाजांना दणका

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणारे आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यावर सांगली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात 40 ठिकाणी नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पहाटेपर्यंत सुमारे 500 पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात होते. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आऊट मोहीम राबवण्यात आली. यामध्ये हद्दपार तडीपार आणि सराईत गुन्हेगागारांचा शोध घेण्यात आला. तर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी रात्री उशिरा अनेक ठिकाणी फिरून तपासणी नाक्यांची पाहणी देखील केली.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळेच म मंदिराचे बाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागले आहे तर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शनाला लागत आहे नवीन वर्षाचे पहिले दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिक मध्ये दाखल झाले आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटना बरोबरच मंदिरात दर्शनाचा योग जुळून आणला आहे आणि त्यामुळे सर्व पर्यटन स्थळ आणि देवस्थानंवर मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळत आहे.

Maharashtra Live Update: साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात, साईनामाच्या जयघोषाने दुमदुमली साईनगरी

देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेलीय... नववर्षाची सुरूवात साईदर्शनाने करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.. नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.