Maharashtra Politics live update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन
Sarkarnama January 02, 2025 01:45 AM
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला येणार वेग

राज्य सरकारकडून चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारला

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारला आहे. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्यभरातील मराठा समाजाने एकत्र येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. नांदेड येथील मराठा आरक्षण बैठकीदरम्यान उपोषणासंबंधित निर्णय घेण्यात आला.

Shivsena UBT Meeting : मनपा निवडणुकीबाबत ठाकरे गटाच्या 7 ते 9 जानेवारी दरम्यान बैठका

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या स्थगित करण्यात आलेल्या बैठका 7 ते 9 जानेवारी ड्रामायन होणार आहेत. महापालिका निवडणुकीची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यासाठीची रणनीती आतापासूनच आखली जात आहे. त्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यतच या बैठक होणार होत्या, मात्र, अचानक या बैठका स्थगित करण्यात आल्या होत्या. स्थगित करण्यात आलेल्या या बैठका 7 ते 9 जानेवारीदरम्यान शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Cabinet meeting : मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश

राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या (गुरुवारी) दुपारी बारा वाजता ही बैठक होते आहे. मंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही, या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्वाची ठरणार आहे. खातेवाटपानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक होत आहे.

Walmik Karad Surrender : वाल्मिकी कराड याची प्रकृती बिघडली?

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड हा मंगळवारी पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात रात्री हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावे लागले. सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन लावले असल्याची माहिती आहे.

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्येतील आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात? CIDकडून झाडाझडती सुरु

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी अॅक्शन मोडवर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी करण्यात येत आहे. फरार तिन्ही आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. नातेवाईकांच्या संपर्कात हे तिन्ही आरोपी आहेत का? याचा ही तपास सीआयडी करीत आहेत. सीआयडीचे पथक फरार आरोपींच्या शोधात आहेत.

Santosh Deshmukh Case : देशमुख कुटुंबियांचे करणार सात्वन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. 3 जानेवारी रोजी ते मस्साजोग येथे जाणार आहेत. देशमुख कुटुंबियांचे सात्वन करणार आहेत. या प्रकरणाची माहिती घेणार आहेत.

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; आज जलसमाधी आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आज जलसमाधी आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून फरार आरोपींनी अटक करा, अशी मागणी करत ते आज जलसमाधी आंदोलन करीत आहेत

Koregaon Bhima Shaurya Divas: विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायींनी पहाटेपासून गर्दी

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज शौर्यदिन साजरा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी पहाटे पासून गर्दी केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथील या ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 5 हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Jalgaon News : गाडी जाळली

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. काही समाजकटकांनी यावेळी एक गाडी पेटवून दिली आहे. सध्या परिस्थिती पोलीस नियंत्रणाखाली आहे. पाळधी येथे संचारबंदी लावण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.