मुंबई : देशातील शेअर बाजारात माेठी तेजी आहे. सेन्सेक्सने तब्बल 1200 अंकांनी उसळी घेतली. या तेजीमुळे टॉस द कॉईनचा शेअर्स 15 टक्के वधारला आहे. यासह या शेअर्सने 623.80 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.
लिस्टिंगला माेठा परतावाटॉस द कॉईनचे शेअर्स गेल्या महिन्यातच बाजारात सूचीबद्ध झाले. कंपनीचे शेअर्स 17 डिसेंबर रोजी 90 टक्के प्रीमियमसह 345 रुपयांवर सूचीबद्ध झाले. आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 182 रुपये होती. लिस्टिंगपासून शेअर्सने आतापर्यंत फक्त 12 ट्रेडिंग दिवसांमध्ये 243 टक्के नफा दिला आहे.
अप्पर सर्किटला मर्यादा वाढवलीशेअर बाजाराने बुधवार 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या अप्पर सर्किटची किंमत 5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये सकाळी 0.33 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत हा शेअर 6 टक्क्यांनी वाढून 575 रुपयांवर व्यवहार करत होता. ट्रेडिंगच्या पहिल्या 35 मिनिटांत किमान 80,000 शेअर्समध्ये बदल झाले. तर गेल्या दोन आठवड्यात कंपनीच्या सरासरी 71,000 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. कंपनीचे मार्केट कॅप 113.78 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कंपनीचा व्यवसायटॉस द कॉईन ही चेन्नई आधारित विपणन सल्लागार कंपनी आहे. कंपनीची स्थापना 2020 मध्ये झाली. कंपनी आपल्या ग्राहकांना सानुकूलित विपणन सेवा प्रदान करते. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ब्रँडिंग, कंटेंट निर्मिती आणि डिझाईनमधील कौशल्यासह, टॉस द कॉइन सर्व आकारांच्या तंत्रज्ञान संस्थांसाठी प्रभावी गो-टू-मार्केट धोरण विकसित करते. टॉस द कॉइन आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओला 1,025 पेक्षा जास्त पट बाेली मिळाले. कंपनीच्या 9.17 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये 504,000 शेअर्सचा समावेश होता. किंमत बँड 172-182 रुपये प्रति शेअर होती. तर लाॅट आकार 600 शेअर्सचा आकार होता.