वांद्रे येथे भीषण आगीत 20 झोपड्या जळून खाक; एकजण जखमी
Marathi January 05, 2025 07:24 AM

वांद्रे पूर्व ज्ञानेश्वर नगर येथील झोपडपट्टीत शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तब्बल 20 झोपडय़ा जळून खाक झाल्या आहेत. तर शेरखान (60) ही व्यक्ती आगीची झळ बसल्याने जखमी झाली असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दीड ते दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले आणि आग संपूर्णपणे विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार, वांद्रे (पूर्व) ज्ञानेश्वर नगर येथील झोपडपट्टीत शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. यावेळी, इलेक्ट्रिक कायरिंग, उपकरणे, लाकडी फर्निचर आणि गॅस सिलिंडर यांना आग लागल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ही आग काही कालावधीतच भडकली. त्यामुळे या आगीत 20 झोपड्या जळून खाक झाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.