Ghevda Benefits: घेवडा ज्याला काही ठिकाणी पापडी असे देखील म्हणतात. शेंगाभाजीच्या (Beans) गटात मोडणारी ही भाजी बनवायला देखील खूप सोपी आणि रुचकर लागते. स्ट्रिंग बीन्स, फ्रेंच बीन्स आणि स्नॅप बीन्स अशा बीन्सच्या वेगवेगळ्या जाती आहेत. ज्यामध्ये घेवड्यात व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असते. याशिवाय घेवडा फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी देखील या भाजीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ भोगीची भाजी, पुलाव भात, फ्राईड राईस ई.)