Side Effects of Force-Feeding Children: मूल पोटभर खात नाही म्हणून त्याला जबरदस्ती भरवणे किती योग्य?
Times Now Marathi January 07, 2025 03:45 AM

Side Effects of Force-Feeding Children: लहान मुलांना चांगले पोषण मिळावे यासाठी प्रत्येक आईवडील प्रयत्न करता असतात. मूल पोटभर जेवावे यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून त्याला खाऊ घालतात. यादरम्यान काही मुलं खूपच कमी जेवतात, मग अशावेळी पालक त्यांना अजून खाऊ घालतात. मूल कमी खाते म्हणजे ते अर्धवट पोटी आहे असे समजून त्याला जबरदस्ती भरवले जाते. पण असे केल्याने मुलांना खरंच पोषण मिळते का? तसेच मुलांना जबरदस्तीचे जेवण भरवून खरंच काही फायदा होतो का? याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख पूर्ण वाचा.

बहुतांश माता आपल्या मुलाला अन्न भरवताना खूप जबरदस्ती करतात. मूल खेळत असेल, किंवा इकडे तिकडे पळत असेल तर त्याला नादावून घास भरवणे सामान्य गोष्ट आहे. पण काही आया मूल अगदी उलटी करेपर्यंत त्यांना भरवतात. जे अजिबात योग्य नाही. तुम्ही देखील अशीच काही चूक करत आहात का? मुलांना प्रमाणाच्या बाहेर खाऊ घालणे किंवा ते वारंवार नाही म्हणत असले तरी त्याला पकडून खाऊ घातल्याने, त्याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

लहान मुलांना जबरदस्ती अन्न भरवण्याचे दुष्परिणामअन्नाची योग्य आणि समतोल मात्राचं सेवन हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पण जर मुलांना जबरदस्तीने अन्न खायला घाललं, तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

पचनाशी संबंधित समस्या
जबरदस्ती अन्न खाण्यामुळे मुलांच्या पचन प्रक्रियेला त्रास होऊ शकतो. मुलांची पचनसंस्था अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे जास्त प्रमाणात अन्न खालल्यामुळे गॅस, अपचन, पोटफुगी, किंवा डायरिया यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खाण्याच्या सवयीवर नकारात्मक प्रभाव
जबरदस्ती अन्न खाण्यामुळे मुलांच्या खाण्याच्या सवयी खराब होऊ शकतात. मुलं अन्न खाण्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवतात, ज्यामुळे त्यांना पुढे जाऊन निरोगी जेवण जेवण्याची सवय लागत नाही. ते अन्न टाळण्याची आणि खाण्यापासून बचाव करण्याचा विचार करत राहतात.

आत्मविश्वास आणि मानसिक दडपण
मुलांवर अन्नाच्या बाबतीत दबाव आणल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ते अन्न खाणं किंवा जेवण जेवणं हे एखाद्या तणावपूर्ण गोष्टीसारखं मानू लागतात. यामुळे मुलांना जेवण म्हणजे मानसिक दडपण, चिंता वाटू लागते. ज्यामुळे ते त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी होण्याचा अनुभव घेऊ शकतात.

वजन वाढीचा धोका
जबरदस्तीने अन्न खायला घालल्यामुळे मुलांमध्ये तृप्तीची भावना कमी होऊ शकते, आणि ते अधिक अन्न खात राहतात. यामुळे वजन वाढू शकते आणि भविष्यात लठ्ठपणेच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

अन्नाविषयी नकारात्मक भावना
जबरदस्ती अन्न खायला घालल्यामुळे त्यांचा आहारातील रुची आणि विविधतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अन्नाच्या बाबतीत जबरदस्तीच्या दबावामुळे मुलं अन्नाशी संबंधित नकारात्मक भावना निर्माण करू शकतात. कालांतराने ते अन्न टाळू लागतात.

पोषक तत्त्वांची कमी
मुल जर आपल्या इच्छेनुसार खत नसेल तर त्यामुळे त्याकज्या शरीराला ते अन्न लागत नाही, ज्यामुळे पोषण तत्त्वांची अडचण होऊ शकते. हे मुलांच्या शरीराच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकते.

हवामानातील बदलाचा प्रभाव
ज्या मुलांना दबावाच्या अंतर्गत अन्न खायला घाललं जातं, त्यांना वेळोवेळी शारीरिक तणाव आणि असंतुलित आहारामुळे सर्दी, ताप किंवा इतर रोग होण्याचा धोका जास्त असतो.

चॉकअप किंवा श्वास गुदमरण्याचा धोका
अनेकदा पालक मुलं नाही म्हणत असताना देखील त्यांना जबरदस्ती भरवतात, अशावेळी ते अन्न त्यांच्या घशात अडकू शकते, त्यांच्या श्वसनमार्गीकेमध्ये अन्नाचा तुकडा अडकल्याने श्वास घेण्यास अडचण होणे, गुदमरणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Disclaimer: वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहे, हा कोणत्याही वैद्यकीय मताचा पर्याय नाही, त्यामुळे यासंबंधित अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.