नितेश राणे, गणेश नाईक ते प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले…; महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची
Marathi January 04, 2025 12:24 PM

महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी: मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) देखील पाहायला मिळतेय. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.

संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीत नागपूरचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे, तर ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना मिळेल. सध्या सर्वांत जास्त चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे. तर पुण्याचे पालकमंत्रिपद देखील अजित पवारांना मिळेल.

महाराष्ट्राच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी- (Maharashtra Guardian Ministers List)

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – भाजप
गोंदिया – आदिती तटकरे
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – आशिष शेलार
नंदुरबार – अशोक ऊईके
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – दत्तात्रय भरणे
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील

भरत गोगावले रायगडेचे पालकमंत्री होणार; महेंद्र दळवींना विश्वास

सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून कोण पालकमंत्री होणार यावरून वादविवाद सुरू आहे. शिवसेनेचे आमदार आणि फडणवीस सरकार मध्ये यंदा मंत्रिपदाची पहिल्यांदा गळयात माळ पडलेले भरत गोगावले हे सुध्दा सुरुवातीपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कायम इच्छुक राहिलेत मात्र सुनील तटकरे यांचं केंद्रापर्यंत असलेलं वजन पाहता त्यांनी आदिती तटकरे यांच्या गळ्यात ठाकरे सरकार काळात पालकमंत्री पदाची माळ पाडून घेतली होती. त्यानंतर जिल्हयातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी बंड पुकारला होता आणि त्यांच्या बंडाला यश देखील आले होते. आणि त्यानंतर रायगडचे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या उमेदवार असलेले उदय सामंत यांच्या पदरी पडले होते.आता हीच वेळ सरकार मध्ये असुन सुध्दा गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यावर आली असली तरी गोगावले यांनाच वाढता पाठींबा मिळताना पहायला मिळतोय. कारण मंत्री झालेल्या भरत गोगावलेंच्या मदतीसाठी पुन्हा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी उडी घेतली आहे. अलिबाग मुरूड मतदार संघाचे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर आता खुल चॅलेंज देऊन कोणी पालकमंत्री पदासाठी इच्छुक असेल तर त्यांनी ते प्रयत्न करू नये. कोणत्याही क्षणी भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.

संबंधित बातमी:

संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह ‘हे’ बडे नेते सहभागी होणार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.