लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं. तिने ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ती अनेक हिट चित्रपटात दिसली. आमिर खानपासून ते सुनील शेट्टीपर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत ती मोठया पडद्यावर झळकली. मात्र एक अशी वेळ होती जेव्हा तिचं नाव विवाहीत अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. तो अभिनेता होता सुनील शेट्टी. तिला चक्क रात्री २ वाजता अभिनेत्याने फोन करत लग्नाची मागणी घातली होती. एका मुलाखतीत सोनालीने हा अनुभव सांगितला होता.
सोनाली आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) 'सपूत', 'रक्षक' आणि 'टक्कर' या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडली. त्यानंतर सोनीली आणि सुनील एकमेकांचे चांगल मित्र झाले. त्यानंतर सोनाली आणि सुनील शेट्टी यांच्या अफेयर्सच्या चर्चा जोर धरू लागल्या. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. त्यावर सोनालीने या मुलाखतीत भाष्य केलं होतं.
सोनाली बेंद्रेने 'न्यूज १८ शोशा' ला मुलाखत दिलेली. तेव्हा तिने तिच्या आणि सुनील शेट्टीच्या अफेअरच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, 'या अफवांमुळे मी आणि सुनील टेन्शमध्ये आलो होतो. सुरुवातीला चर्चा ऐकून आम्ही देखील खूप हसलो होतो. पण, याचा परिणाम आमच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला. मला कल्पना नाही की अफेयर्सच्या खोट्या चर्चांमुळे सुनीलला काही फरक पडला असेल की नाही. परंतु माझ्यासोबत त्यावेळी जे घडलं त्याबद्दल मी सांगू शकते. मी त्यावेळेस सिंगल होते त्यामुळे कोणाला उत्तर द्यावं असं मला वाटत नव्हतं पण सुनीलचं लग्न झालं होतं.'
ती पुढे म्हणाली, 'लोकांना या गोष्टी समजतच नाही. मध्यरात्री २ वाजता कोणीही अज्ञात माणूस तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की मी सुनील शेट्टी बोलतोय. माझ्यासोबत लग्न कर. या एका फोनमुळे मी प्रचंड घाबरले होते. मग मी हा घडलेला सगळा प्रकार सुनीलला सांगितला. त्यामुळे तो देखील स्ट्रेसमध्ये आला होता. नंतर हे प्रकरण तिथेच मिटलं.' सोनाली बेद्रेंचं गोल्डी बहल यांच्यासोबत झालं आहे आणि तिला एक मुलगा देखील आहे.