Chitra Wagh on Anjali Damania : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. मला चार दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, फोन अजून बंद झालेले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बीड प्रकरणात टीका आणि आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत कमेंट्सही समाज माध्यमांवर केल्या जात असल्याचे पुढे आले होते.
दरम्यान, याच मुद्यावरून अंजली दमानिया यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत आल्यानंतर ही भेट होणार असल्याची माहिती आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची ही दमानिया भेट घेणार आहे. अशातच या भेटीपूर्वी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनी गुन्हे विभागाच्या सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.
अंजली दमानिया यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत कमेंट्स करणाऱ्या, त्यांना धमक्यांचे फोन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह पोलिस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असे वक्तव्य केले. आता अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय. यावेळी त्यांना विनंती करणारं पत्र दिलं असून तत्काळ या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात ते कुठल्याही महिलेबाबात असं वागण्याचं धाडसही करणार नाही.
विरोधक असो वा आणखीन कोणी इथे प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि समस्त महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ तुम्हाला कायद्याचा आणि कायद्याने फटका देतील, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येक बहिणीची प्रत्येक लेकीबाळीची अब्रु महत्त्वाची आहे. त्यामुळेच देवाभाऊंच्या समस्त बहिणींच्या वतीनं सांगतेय, कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी इशाराही दिला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..