khaman Dhokla Video: मिक्सरचा वापर करून घरीच बनवा मार्केटसारखा खमंग ढोकळा, पाहा रेसिपीचा सोपा व्हिडिओ
esakal January 05, 2025 02:45 PM

khaman Dhokla Recipe: ढोकळा हा सर्वाचा आवडता पदार्थ आहे. घरी पाहुणे आले की, काही सण-उत्साह असाला की ढोकळा सर्वाच्या घरी आणला जातो. पण तुम्हाला मार्केटसारखा ढोकळा बनवायचा असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता. खमंग ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बेसण

मीठ

तेल

हिंग

लिंबू सत्व

साखर

हिरवी मिरची

कढीपत्ता

ढोकळा बनवण्याची कृती

मोठ्या मिक्सरच्या भांड्यात बेसण पीठ, साखर, तेल, हिंग, लिंबू, सत्व,पाणी चांगेल मिक्स करावे. नंतर एका काचेच्या भांड्यात सारण काढा.नंतर एका मोठ्या परातीला तेल लावा. सारणात मीठ टाका. चमच्याने चांगले मिक्स करा आणि नंतर बेकिंग सोडा टाकून चांगले फेटा आणि परातीत टाका. परात गरम कढईत ठेवा. १५ मिनिटे वाफवा. नंतर मिरची आणि कढपत्त्याचा तडका लावा. तुम्ही टोमॅटो सॉससोबत ढोकळा खाऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.