Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यातील वातावरणात गेल्या आठवडाभरापासून चांगलाच बदल दिसून येत आहे आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचा आता पुन्हा जोर वाढू लागला आहे. गारठा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहे. राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीमुळे थंडी गायब झाली होत अवकाळीचे संकट निर्माण झाले होते. त्यावेळी तापमानात वाढ झाली होती आणि फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा जाणवत होता. मात्र, आता थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पुढील तीन दिवस काडाक्याची थंडी राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
सध्या राज्यातील तापमानाचा पारा घसरल्याचे चित्र आहे. राज्यात शुक्रवार, पासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील किमान तापमान घसरले आहे. पहाटेच्या किमान तापमानात लक्षणिय घट झाली असून कडाक्याची थंडी जाणवत आहे. गेल्या दोन दिवसाचे तापमान लक्षात घेता नाशिक शहराचे किमान तापमान 10.1 अंशावर आले आहे. तर निफाडचे तापमान 07.3 अंश नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसात थंडीचा हा जोर अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे.