Latest Maharashtra News Updates : कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत निर्मला सीतारारामन यांची बैठक
esakal January 06, 2025 05:45 PM
Nirmala Sitharaman Lives Updates: कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत निर्मला सीतारारामन यांची बैठक

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 संदर्भात भागधारक आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आठव्या पूर्व अर्थसंकल्पीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं.

Nirmala Sitharaman Nashik Live : नाशिकच्या तपोवन परिसरात जॉगिंग ट्रॅकलगत युवकाची आत्महत्या

नाशिकच्या तपोवन परिसरात जॉगिंग ट्रॅकलगत युवकाची आत्महत्या

- युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने लटकून केली आत्महत्या

- आडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

- युवक हा जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील असल्याचा अंदाज

- युवकाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

Hingoli Live : हिंगोलीत पोलीस प्रशासनाविरोधात महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

हिंगोलीत पोलीस प्रशासनाच्या विरोधात शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटल्या

विद्यार्थ्याच्या आत्महत्ये प्रकरणात आरोपींना दोन महिन्यापासून अटक होत नसल्याने आंदोलन

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढे महिला आंदोलकांनी घोषणाबाजी

Live : पालकमंत्रीपदाबाबत तिढा नाही, आज चर्चा पूर्ण होईल - चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्रीपदाबाबत तिढा नाही, आज चर्चा पूर्ण होईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Pune Live: जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला लागली आग

पुण्यातील भोर तालुक्यातल्या सांगवी, घोरेपडळ गावात, जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या टेम्पोला विजेच्या तारांचे घर्षन झाल्यान टेम्पोतील चाऱ्याला आग लागल्याची घटना..

जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या टेम्पो रस्त्यावरून जात असताना, रस्त्यावरील विजेच्या तारांचे चाऱ्यासोबतच घर्षन झाल्यान टेम्पो मधील चाऱ्याने घेतला पेट..

Nagpur Live: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस यांच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीस यांच्या भेटीला,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपेठ निवासस्थानी दाखल

Solapur Live: सोलापूर शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे.

वाहतूक पोलिस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्याप्रमाणेच शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे.

वाहतुकीचा वेग, तसेच सुधारणा करण्यात येणार आहे,

शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Pune Live: भोर तालुक्यातील दुर्गम कोंढरी गावात वानरांचा टोळीचा धुडगूस

पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम कोंढरी गावात, गेल्या आठवडाभरापासून वानरांचा टोळीचा धुडगूस

एका घराच्या छपरावरून दुसऱ्या घरावर उडी मारून घराची कौलं फुटणे, रस्त्याने जाणाऱ्या नागरिक आणि लहान मुले यांच्या हातातील वस्तू पळविणे तसेच घराबाहेरील वस्तू पळविणे असे वानरांकडून प्रकार सुरू, नागरिक भयभीत

Weather News LIVE : मराठवाडा, मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

राज्यात एकीकडे गारठा वाढू लागला असताना हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या सरीही कोसळणार आहेत.

Manoj Jarange Patil : परळीनंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परळीनंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आधी ओबीसी बांधवांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर त्या ठिकाणी देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Devendra Fadnavis LIVE : पंचकल्याणक पूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदणीला भेट देणार

पंचकल्याणक पूजेसाठी आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणीला भेट देणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांनी कामाचा आढावा घेतला. नांदणी येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी पंचकल्याणक पूजा समितीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन पूजा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Bike Accident LIVE : मोटारसायकलच्या धडकेत शिरोलीत तीन मजूर जखमी

नागाव : मोटारसायकलच्या धडकेत तिघे बांधकाम मजूर जखमी झाले. मायाप्पा हणमंता अलकुंटे (वय ५०), रामाप्पा भीमाप्पा गाडीवडर (वय ६०, दोघेही रा. शिवनेरी कॉलनी, इंदिरानगर, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व तुकाराम सिद्धाप्पा जनगेकर (वय ४२, रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दत्त मंदिरसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Pune Airplane LIVE : दाट धुक्यामुळे तब्बल 32 विमानांना उशीर

दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत आहे. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल ३२ विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीत दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसला आहे.

Maharashtra Kesari Competition LIVE : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा; 'या' दिवशी अहिल्यानगरात होणार स्पर्धा

Latest Marathi Live Updates 6 January 2025 : अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणती, या विषयाभोवती चर्चेचे गुऱ्हाळ रंगलेले असताना, नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा केली आहे. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान अहिल्यानगरात ही स्पर्धा होणार आहे. तसेच अनगोळ येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे अनावरण दिमाखदार सोहळ्याद्वारे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी (ता. ५) करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पंचकल्याणक पूजेसाठी आज (ता. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणीला भेट देणार आहेत. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.