बिहार सायबर गुन्हे: सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोण कशा पद्धतीने फसवणूक करेल याची खात्री देऊ शकत नाही. पण बिहारमध्ये काही तरुणांना ज्या प्रकारे फसवण्यात आलं ते वाचून अनेकांना धक्काच बसेल. निपुत्रिक महिलांना गरोदर करा आणि त्या बदल्यात पाच ते दहा लाख रुपये कमवा अशी स्कीम या ठगांनी आणली. या जाळ्यात जे तरूण अडकले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे.
बिहारच्या नवाडा येथे पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
निपुत्रिक महिलांना गरोदर बनवण्याच्या बदल्यात 5 ते 10 लाख रुपये मिळतील अशा प्रकारची स्कीम या आरोपींनी आणली होती. त्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या जाळ्यात आली तर त्याच्याकडून नोंदणीच्या नावावर पैसे उकळण्यात यायचे.
महत्त्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे फक्त 20 वर्षांचे आहेत. आरोपी हे ‘ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब आणि प्ले व्हॉईस सर्व्हिस’च्या नावावर फसवणूक करायचे. निपुत्रिक महिलेला गर्भवती करण्यासाठी जाहिरात द्यायचे. त्यामध्ये एकादा तरुण यांच्या जाळ्यात सापडलाच तर त्याच्याकडून नाव नोंदणीच्या नावाखाली 500 ते 20 हजार रुपये घ्यायचे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा मोबाईल जप्त करण्यात आले. फोटो गॅलरी, व्हॉट्सॲप चॅट आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी ही फसवणूक केल्याचं उघडकीस आली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सॲप सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे यूजर्सना एक मेसेज दिला जायचा. हाय प्रोफाइल मुली किंवा तरुणीला गर्भवती करायचे आहे असा मेसेज असायचा. ही मुलगी घटस्फोटित किंवा मोठ्या घरची गृहिणी असल्याचा दावाही जाहिरातीत करण्यात यायचा. ती मुलगी गर्भवती होऊ शकत नाहीत म्हणून त्या एजन्सीशी संपर्क साधतात असं त्यामध्ये सांगण्यात यायचं. यानंतर एजन्सी ग्राहकाशी संपर्क साधत असल्याचा बनाव ते करायचे.
संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर 5 ते 10 लाख रुपये मिळतील असे जाहिरातींद्वारे सांगितले जायचे. जर मुलगी गरोदर राहिली नाही तर त्यांना पैसे परत दिले जातात असंही त्या जाहिरातीमध्ये सांगितलं जायचं. जाहिराती पाहून लोक जेव्हा या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात यायचे तेव्हा त्यांना नोंदणी शुल्क भरून लाभ घेता येतो असे सांगितले जाते. या प्रकरणात कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून नाव नोंदणी शुल्क आकारले जाते असं ते सांगायचे. त्यामुळे या जाहिरातीला अनेकजण भुलले आणि त्यांनी पैसेही भरल्याचं समोर आलं.
अधिक पाहा..