काकासह तीन भावांनी भोगली शिक्षा
झाशी बिहारमधील पोलिसांच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या झाशी येथील हा प्रकार आहे. नथुनी पाल याच्या हत्येच्या गुन्ह्यखाली त्याचे काका आणि तीन भावांना शिक्षा झाली होती. १७ वर्षानंतर हा नथुनी पाल जिवंत सापडला आहे. त्याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली नथुनी पालचे काका आणि तीन चुलत भाऊ यांनी शिक्षा भोगली आहे. या दरम्यान काकांचा मृत्यू झाला तर तिघेही भाऊ जामीनावर बाहेर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार २००७ मध्ये नथुनी पाल याच्या कुटुंबियांनी तो बेपत्त झाल्याची तक्रार पोलिसांकडे केलेली होती. यावेळी नथुनीचे काका आणि चार भाऊ यांनी जमीन हडपण्यासाठी नथुनीचा खून केल्याचा आरोप कुटुंबिंयांनी केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एका तरुणाची मुक्तता झाली, तर काकांसह तीन भावांना तुरुंगात टाकण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ६ जानेवारी रोजी गस्त घालताना नथुनी हा संशयास्पद अवस्थेत आढळला. यावेळी पोलिसांची नथुनीची अधिक चौकशी केली असता नथुनीने सांगितले, नथुनी काही वर्षापूर्वी झाशीला रहायला होता. सध्या तो एकटात राहतो आणि त्याचे आई-वडील वारले आहेत. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर १७ वर्षांपासून तो गाव सोडून कुठेतरी गेला होता. नथुनीच्या हत्येप्रकरणी तिघे जामिनावर आहेत तर नथुनी गेल्या १७ वर्षांपासून कुठे आणि कसा राहत होता याची अधिक तपासणी पोलिस करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी नथुनीच्या हयातीची कागदपत्रे न्यायालयापुढे सादर करण्याची तयारी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नथुनीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून त्याच्या कुटुंबियांचाही यासंदर्भात जबाब घेण्यात आलेला आहे.