China New Virus: HMPV व्हायरसमुळे चिंता वाढली! केंद्रासह महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट; जारी केल्या 'या' सूचना
Times Now Marathi January 06, 2025 05:45 PM

China New Virus HMPV: जग आजही कोरोना व्हायरसच्या झळा सोसत आहे. कोरोनाच्या संकटातून जग सावरत नाही तोच आता नवीन संकट निर्माण झालं आहे. सध्या चीनमध्ये नवीन व्हायरस पसरला आहे. कोरोनानंतर, आता या व्हायरसने भारतासह जगाची चिंता वाढविली आहे. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार देखील सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत बैठक बोलावली होती. सध्या चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विभाग देखील अलर्टवर आहे. त्या दृष्टीने अवश्यक त्या सूचना आरोग्य यंत्राणांना देण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये हा व्हायरस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा अनुभव लक्षात घेता खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या बाबत निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे लोकांना HMPV व्हायरसबद्दल माहिती दिली जात आहे. या विषाणू बाबत काळजी करण्याची गरज नाही, असे देखील मंत्रालयाने म्हटलं आहे. मात्र, सतर्क राहत अवश्यत ती काळजी घेण्याचे देखील अवाहन करण्यात आले आहे.


आरोग्य यंत्रणा सज्ज

चीनमध्ये सुरु असलेल्या या विषाणूच्या परिणामावर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये या विषाणूबाधितांची संख्या वाढत आहे. विषाणूबाधितांची ही संख्या चिंता वाढणारी आहे. रुग्णांमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने इन्फ्लूएंझा व्हायरस, आरएसव्ही आणि एचएमपीव्ही विषाणूमुळे आहेत, जे सामान्य विषाणू आहेत. तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या वातावरणात या विषाणूचा प्रभाव जास्त जाणवतो आणि सर्वाधिक नागरिक बाधित होतात. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा देखील संतर्क असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

तर आरोग्य सेवा महासंचालनालयाचे अधिकारी डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले की, चीनमधून पसरणारा विषाणू हा सर्दीचा सामान्य विषाणू आहे. आरोग्य मंत्रालयाने देशभरातील आरोग्यविषयक आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येचे ही विश्लेषण केले आहे. त्यामुळे अद्याप तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. थंडीत या विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.