Mumbai Metro Line 9: मेट्रोच्या डेपो मार्गात बदल करणार, 600 कोटींची बचत होणार?
Times Now Marathi January 06, 2025 05:45 PM

Dahisar to Mira Bhayander Metro update: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना नववर्षात अनेक प्रकल्पांची भेट मिळणार आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो सेवा यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. या वर्षात दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर या मेट्रो 9 कॉरिडॉरचा पहिला टप्पा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत. याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या सुभाषचंद्र बोस स्थानक ते उन्नतपर्यंतच्या मार्गात बदल करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राई-मुर्धे आणि मोरवा गावातून जाणारी ही मार्गिका सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरुन उत्तनपर्यंत नेण्याबाबत विचार सुरू आहे. असे झाल्यास तब्बल 600 कोटी रुपयांची बचत होऊ शकते असाही दावा करण्यात येत आहे.

हे पण वाचा :

राई-मुर्धे येथे मेट्रोचे कारशेड उभारले जाणार होते पण याला स्थानिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे उत्तनला डोंगरी येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो मार्गावरील शेवटचं स्थानक मीरा भाईंदर येथील सुभाषचंद्र बोस स्टेडियम होते. नियोजनानुसार, सुभाषचंद्र बोस ते उत्तन या दरम्यान नव्याने दोन स्थानके उभरण्यात येणार होती आणि त्यासाठी 160 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षेत होता. पण नव्या नियोजनाननुसार ही मेट्रो मार्गिका पाणथळ आणि मिठागरच्या जमिनीवरुन नेण्यात येणार आहे.

असा आहे मेट्रो 9 दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर) मार्ग
स्थानके - 1. दहिसर, 2. पांडुरंग वाडी, 3. मिरागाव, 4. काशीगाव, 5. साई बाबा नगर, 6. मेदितिया नगर, 7. शहीद भगतसिंग गार्डन, 8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम

लांबी - 13.581 किमी

हे पण वाचा :

एमएमआरडीएने मेट्रो 9 प्रकल्पाचे 92 टक्के काम पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यातील स्थाकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो-9 दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) दरम्यानच्या मेट्रो-7 कॉरिडॉरला आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पश्चिम) दरम्यानच्या मेट्रो-2A कॉरिडॉरला जोडलेले आहे. MMRDA मेट्रो-9 साठी चारकोप डेपो वापरण्याच्या तयारीत आहे. मेट्रो-9 चे कारशेड तयार होईपर्यंत ते मेट्रो-7 आणि मेट्रो-2 A कॉरिडॉरच्या डब्यांच्या देखभालीसाठी सज्ज आहे. या योजनेच्या आधारे मुंबईकरांना 2025 मध्ये आणखी एक मेट्रो मिळू शकते.

विरार लोकलची गर्दी कमी होणार
पश्चिम रेल्वेवरील विरार लोकलला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मात्र, मदहिसर ते भाईंदर ही मेट्रो 9 सुरू झाल्यावर प्रवाशांना भाईंदर ते दहिसर असा प्रवास करता येणार आहे. परिणामी लोकलच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. मेट्रो-9 चा हा नवीन मार्ग दहिसर ते डीएन नगरला जोडणार आहे. त्यामुळे दहिसर हे अंधेरी पूर्वेला जोडले जाणार आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.